Video: 'काय सांगता! फाफने हे केलंय...?', RCB च्या कर्णधाराने असं काय केलं की विराटसह सर्वच खेळाडू शॉक

Faf du Plessis T20 Record: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने केलेला कारनामा ऐकून विराटसह संघातील कोणत्याच खेळाडूचा विश्वास बसेना, पाहा व्हिडिओ
Virat Kohli | Faf du Plessis | RCB  | IPL 2024
Virat Kohli | Faf du Plessis | RCB | IPL 2024Sakal
Updated on

RCB Captain Faf du Plessis: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सध्या भारतात चालू असून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

दरम्यान, आयपीएल स्पर्धेदरम्यान फ्रँचायझी आपापल्या संघात वेगवेगळे उपक्रमही घेत असतात, त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ बेंगळुरू संघाचाही व्हायरल होत आहे.

खंरतर हा व्हिडिओ बेंगळुरूने सोशल मीडियावर शेअर केला असून व्हिडिओमध्ये सर्व खेळाडूंना प्रश्न विचारण्यात आला आहे की टी20 क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यात 5 विकेट्स सर्वात पहिल्यांदा कोणी घेतल्या आहेत?

मात्र या प्रश्नाचे उत्तर बेंगळुरूच्या 25 पैकी 24 खेळाडूंना देता आले नसल्याचेही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तसेच 10 पैकी 9 चाहत्यांनाही हे उत्तर देता येणार नाही, असा दावाही केला आहे. याशिवाय त्या प्रश्नाचे उत्तर असलेला खेळाडू बेंगलोरकडून खेळत असल्याची हिंटही देण्यात आली आहे.

Virat Kohli | Faf du Plessis | RCB  | IPL 2024
IPL 2024, Video: पहिल्या विजयानंतर RCB च्या खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये कल्ला, पाहा कसं केलं सेलिब्रेशन

दरम्यान, व्हिडिओमध्ये खेळाडू हर्षल पटेल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, अनिल कुंबळे अशा बेंगळुरू संघात सध्या असलेल्या आणि आधी खेळलेल्या गोलंदाजांचे नाव घेतात. मात्र सर्वांचेच उत्तर चुकते.

या प्रश्नाचे उत्तर आहे, फाफ डू प्लेसिस. तथापि, व्हिडिओमध्ये डू प्लेसिसलाही हा प्रश्न विचारण्यात आला आहे, तेव्हा तो की आंतरराष्ट्रीय टी20 की देशांतर्गत असं विचारल्यानंतर स्वत:चे नाव घेतो. याशिवाय जेव्हा सर्व खेळाडूंना कळते की खरे उत्तर फाफ डू प्लेसिस आहे, तेव्हा कोणाचाच विश्वास बसत नाही.

विराट कोहली देखील मोठ्या आश्चर्याने हे विचारतो की 'फाफने हे केलंय?' ग्लेन मॅक्सवेलसह देखील अनेक खेळाडू डू प्लेसिसने हा विक्रम केला असल्यावर विश्वासच बसत नसल्याचे सांगतात. अनेकांना फाफ लेग स्पिन गोलंदाजीही करू शकतो, हे देखील माहित नसल्याचे व्हिडिओमध्ये सांगतात.

Virat Kohli | Faf du Plessis | RCB  | IPL 2024
IPL 2024 : रोहित शर्माला पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार? माजी दिग्गजांचे मोठे विधान

फाफ डू प्लेसिसने कधी केलेला विक्रम?

फाफ डू प्लेसिसने 2011-2012 मध्ये हा विक्रम केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑक्टोबर 2011 मध्ये इस्टर्नर्सविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यांत 4 षटकात 19 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मार्च 2012 मध्ये लायन्सविरुद्ध त्याने 4 षटकात 28 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे डू प्लेसिसने 2012 मध्ये घेतलेल्या 5 विकेट्समध्ये क्विंटन डी कॉक, नील मॅकेन्झी, ड्वेन प्रीटोरियस, ख्रिस मॉरिस आणि थामी त्सोलेकिल या खेळाडूंचा समावेश होता. डी कॉक झेल बाद झालेला, तर अन्य फलंदाज त्रिफळाचीत झाले होते.

फाफ डू प्लेसिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेत 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दित 41 विकेट्स, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 54 विकेट्स आणि टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.