IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

RCB Celebration: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यानंतर बेंगळुरूच्या संघाने जोरदार जल्लोष केला.
RCB Celebration
RCB CelebrationSakal
Updated on

IPL 2024, RCB vs CSK: आयपीएल 2024 स्पर्धेत 68 वा सामना शनिवारी (18 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 27 धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफमध्येही प्रवेश केला.

बेंगळुरूला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात 18 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे आता बेंगळुरू प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.

बंगळुरूपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

RCB Celebration
Virat Kohli: चिन्नास्वामीवर कोहलीचा 'विराट' पराक्रम! CSKविरुद्ध अर्धशतक हुकलं, पण 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर

दरम्यान बंगळुरूसाठी हा हंगाम संमिश्र राहिला. त्यांना पहिल्या आठ सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी प्लेऑफ कठीण वाटत होते. मात्र, त्यानंतर बेंगळुरूने अफलातून पुनरागमन केले आणि पुढील सहा सामने जिंकत प्लेऑफ गाठली आहे. त्यामुळे बंगळुरू संघाने विजयानंतर जोरदार जल्लोष केला.

या सामन्यात शेवटचा चेंडू होताच बेंगळुरूचे सर्व खेळाडू मैदानात पळत आले. यावेळी विराट कोहलीही अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले. खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारत जोरदार सेलिब्रेशन केले.

चेन्नईला अखेरच्या दोन चेंडूत प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 10 धावांची गरज होती. परंतु, त्यांना 1 धावच घेता आल्याने त्यांचे प्लेऑफचे स्वप्न भंगले, तर बेंगळुरूच्या चौथ्या क्रमांकावर शिक्कामोर्तब झाले.

RCB Celebration
RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. त्यानंतर 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 7 बाद 191 धावाच करता आल्या.

बेंगळुरूकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 54 धावा केल्या, त्याचबरोबर विराट कोहलीने 47 धावांची आणि रजत पाटिदारने 41 धावांची खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या.

चेन्नईकडून फलंदाजी करताना रचिन रविंद्रने 61 धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच रविंद्र जडेजाने 42 धावा केल्या, तर अजिंक्य रहाणेने 33 आणि धोनीने 25 धावांची खेळी केली. मात्र त्यांना विजय मिळवून देता आला नाही.

बंगळुरूकडून गोलंदाजी करताना यश दयालने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com