कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा त्यांच्यात घरच्या मैदानावर 7 फलंदाज राखून पराभव केला. आयपीएल 2024 मधील होम टीमने सलग 9 सामने जिंकले होते. अखेर हा सिलसिला केकेआरने तोडला.
आरसीबीचे 183 धावांचे आव्हान केकेआरने 16.5 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. केकेआरकडून सुनिल नारायणने 47, व्यंकटेश अय्यरने 50 तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 39 धावांची खेळी केली. फिल्प सॉल्टने देखील 30 धावा करत दमदार सलामी दिली होती.
आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात आज आरसीबी आणि केकेआर एकमेकांना भिडत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने दमदार 82 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने शेवटच्या दोन षटकात धडाकेबाज फलंदाजी करत 8 चेंडूत 20 धावा केल्या. आरसीबीच्या मधल्या फळीने मात्र निराशा केली. ग्रीनच्या 33 अन् मॅक्सवेलच्या 28 धावांची खेळी सोडता इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केकेआरकडून आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
केकेआरचा डावखुरा फलंदाज व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावांची खेळी करत सामना जवळ आणला. मात्र विजयासाठी 16 धावांची गरज असताना तो बाद झाला.
केकेआरने आयपीएल 2024 मधील आतापर्यंतच्या पॉवर प्लेमधील सर्वात चांगली धावसंख्या उभारली. त्यांनी 6 षटकात बिनबाद 85 धावा ठोकल्या. सुनिल नारायणने 20 चेंडूत 47 तर फिल्प सॉल्टने 16 चेंडूत 26 धावा ठोकल्या.
आरसीबीचे 183 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरने पहिल्या 4 षटकातच अर्धशतकी मजल मारली. केकेआरने 4 षटकात बिनबाद 56 धावा केल्या. सॉल्ट 27 तर नारायण 24 धावांवर खेळत होते.
आरसीबीची मधली फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना विराट कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावांची खेळी करत आरसीबीला 20 षटकात 6 बाद 182 धावांपर्यंत पोहचवले. विराटसोबतच कॅमरून ग्रीनने 33 तर मॅक्सवेलने 28 धावांचे योगदान दिले. दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 20 धावा ठोकत विराटला शेवटच्या दोन षटकात उत्तम साथ दिली.
आंद्रे रसेलने 17 व्या षटकात आरसीबीच्या रजत पाटीदारला 3 धावांवर बाद करत चौथा धक्का दिला. आरसीपीच्या 16.3 षटकात 4 बाद 144 धावा झाल्या आहेत.
ग्लेन मॅक्सवेलला केकेआरच्या रमनदीप सिंह आणि सुनिल नारायण या दोघांनी जीवनदान दिलं. मात्र नारायणनेच मॅक्सवेलला 28 धावांवर बाद करत आपली चूक सुधारली. मॅक्सवेल बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या 14.1 षटकात 3 बाद 124 धावा झाल्या होत्या.
विराट कोहलीने आयपीएल 2024 मधील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. त्याच्या या अर्धशतकामुळे आरसीबीने 12 व्या षटकात शतक पार केलं.
फाफ ड्युप्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीचा डाव सावरत 8 षटकात 74 धावा करून दिल्या. त्याला कॅमरून ग्रीनने चांगली साथ दिली.
हर्षित राणाने दुसऱ्याच षटकात आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला 8 धावांवर बाद केले. फाफ बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या 2 षटकात 17 धावा झाल्या होत्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (w), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत आरसीबी प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्याचा नाणेफेक आता काही वेळाने होणार आहे. या मोसमातील हा दहावा सामना आहे, जो आरसीबीच्या घरी खेळला जात आहे. घरच्या मैदानावर खेळलेला शेवटचा सामना आरसीबीने जिंकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.