RCB v LSG : BP वाढवणारा सामना... एक चेंडू... एक धावा... अन् सामना झाला एक नंबर! थरार न झेपणारा

RCB v LSG : BP वाढवणारा सामना... एक चेंडू... एक धावा... अन् सामना झाला एक नंबर! थरार न झेपणारा
Updated on

RCB vs LSG IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्सचा इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सामना BP वाढवणारा होता. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनौचा विजय झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवरील आणखी एका आयपीएल सामन्याने धावांचा पाऊस पाडला. त्यासोबत मागील अनेक हंगामांप्रमाणे, पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांच्या मेहनतीचा नाश केला.

या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या निकोलस पूरनने बंगळुरूचा 1 गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 212 धावांची डोंगराएवढी धावसंख्याही पुरण आणि मार्कस स्टॉइनिस यांच्या स्फोटक खेळीमुळे क्षीण झाली. यासह बेंगळुरूला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

RCB v LSG : BP वाढवणारा सामना... एक चेंडू... एक धावा... अन् सामना झाला एक नंबर! थरार न झेपणारा
IPL 2023 : शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर... लखनौने RCBचा एका विकेटने केला पराभव

एक दिवस अगोदर अहमदाबादमध्ये रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर ५ षटकार मारून रोमांचक विजय मिळवला, तर बेंगळुरूमध्येही शेवटच्या चेंडूवरच सामन्याचा निकाल लागला. लखनौला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 5 धावांची गरज होती आणि 3 विकेट शिल्लक होत्या. या षटकात हर्षल पटेलने 2 विकेट घेतल्या.

एका चेंडूवर फक्त 1 धावांची गरज होती आणि हर्षल पटेलने नॉन स्ट्राईकवर धावबाद करण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. त्यानंतर पुन्हा चेंडू फेकला गेला तेव्हा आवेश खानला तो खेळता आला नाही पण यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला चेंडू नीट पकडता आला नाही. आवेश आणि रवी बिश्नोई धाव घेण्यासाठी धावले. कार्तिकने धावबाद करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि लखनौने सामना जिंकला.

RCB v LSG : BP वाढवणारा सामना... एक चेंडू... एक धावा... अन् सामना झाला एक नंबर! थरार न झेपणारा
RCB vs LSG: रन मशीन विराट कोहली IS BACK! तीन सामन्यातील ठोकले दुसरे अर्धशतक

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली. विराट कोहलीने 44 चेंडूत 61, ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत 59 आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसने 46 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. त्याचवेळी लखनौकडून मार्क वुड आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात लखनौची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाच्या तीन विकेट 23 धावांत पडल्या होत्या. यानंतर मार्कस स्टॉइनिसने 30 चेंडूत 65 धावांची खेळी तर निकोलस पूरनने 19 चेंडूत 62 धावा करत संघाला विजय जवळ आणला.

मात्र, निकोलस पूरन 17व्या षटकात बाद झाला आणि 19व्या षटकात आयुष बडोनीचीही विकेट पडली. यानंतर अखेरच्या षटकात शेपटीच्या फलंदाजांनी लखनौला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर आवेश खानने सिंगल बाय घेतला आणि त्यामुळे पराभव आणि विजयातील फरक सिद्ध झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.