IPL 2023 : रोहित समोर विराटच्या आव्हान! मुंबईची आजपासून ‘शून्या’तून सुरुवात

RCB vs MI IPL 2023 Mumbai Indians' road to redemption begins against Royal Challengers Bangalore cricket news in marathi
RCB vs MI IPL 2023 Mumbai Indians' road to redemption begins against Royal Challengers Bangalore cricket news in marathi
Updated on

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians IPL 2023 : मुंबई इंडियन्स पाच वेळा विजेते; तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर अद्याप पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असले तरी या दोघांमधील आतापर्यंतच्या लढतींमध्ये बंगळूरने नेहमीच बाजी मारली आहे. आता १६ व्या हंगामापासून हे चित्र बदलणार का? याचे उत्तर आज या दोन संघांत होणाऱ्या लढतीतून मिळणार आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येत आहेत. बंगळूरचा संघ पुन्हा एकदा पहिल्या विजेतेपदाची मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न करेल; तर मुंबई इंडियन्सला गतलौकिक पुन्हा सुरू करायचा आहे. गतस्पर्धेत १० संघांत त्यांचा क्रमांका शेवटचा राहिला होता. इतकी खराब कामगिरी कधीच झाली नव्हती, त्यामुळे त्यांना यंदाच्या मोसमात शून्यातून सुरुवात करायची आहे.

RCB vs MI IPL 2023 Mumbai Indians' road to redemption begins against Royal Challengers Bangalore cricket news in marathi
IPL 2023: समतोल राजस्थानची मोहीम आजपासून! बटलर, चहलकडे पुन्हा लक्ष

मुंबईविरुद्ध झालेल्या गेल्या पाच लढतींपैकी अखेरच्या सलग दोन सामन्यांत बंगळूरने विजय मिळवलेला आहे, त्यामुळे हेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बंगळूरचा संघ प्रयत्नशील असेल, पण त्याअगोदर त्यांना उत्तम संघरचना करावी लागणार आहे. रजत पाटीदार आणि जॉश हेझलवूड दुखापतींमुळे काही सामने खेळू शकणार नाही, तसेच धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलही आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. पाटीदारने गत स्पर्धेत आठ सामन्यांतून ५५.५० च्या सरासरीने ३३३ धावा केल्या होत्या. तसेच क्वॉलिफायर-१मध्ये वेगवान शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता, त्यामुळे त्याची उणीव बंगळूर संघाला निश्चितच जाणवू शकेल. बंगळूर संघाला श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा याचीही उणिव जाणवू शकेल.

RCB vs MI IPL 2023 Mumbai Indians' road to redemption begins against Royal Challengers Bangalore cricket news in marathi
IPL 2023 : आयपीएलमध्ये कॅरिबियन तडका! तो कॅच सोडला अन् पठ्याने फक्त नऊ चेंडू ठोकल्या 50 धावा

बंगळूर संघाची मदार अर्थात विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसीवर असणार आहे. विराट कोहली तर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमालीचा फॉर्मात आहे. या आयपीएलमध्येही तो प्रभावशाली फलंदाजी करणार याचे संकेत मिळत आहेत. मुंबईसाठी ही धोक्याच्या घंटा ठरू शकते.

दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा उद्याच्या सलामीच्या लढतीपासून पणास लागणार आहे. गत स्पर्धेत १४ पैकी केवळ चार सामने त्यांना जिंकता आले होते. एकीकडे आव्हानांचा डोंगर असताना जसप्रीत बुमराशिवाय त्यांना हे शिवधनुष उचलावे लागणार आहे; मात्र जोफ्रा आर्चर हे ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे आहे.

RCB vs MI IPL 2023 Mumbai Indians' road to redemption begins against Royal Challengers Bangalore cricket news in marathi
IPL 2023 मधून जवळपास 1 डझन खेळाडू बाहेर! 2 दिग्गज कर्णधारांचाही समावेश...

सूर्यकुमारवर लक्ष

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणारा सूर्यकुमार यादव चर्चेचा विषय ठरला होता. त्याच्यावर दडपण असणार आहेच; मात्र यातून तो कसा मार्ग काढतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

संघ यातून निवडणार ः

  • बंगळूर ः फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शहबाझ अहमद, अनुज रावत, आकाशदीप महिपाल लोमरोर, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, मिशेल ब्रेसवेल. हिमांशू शर्मा.

  • मुंबई ः रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, ईशान किशन, त्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, कॅमेरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, हृतिक शोकेन, पियूष चावला, कुमार कार्तिकेय, जोफ्रा आर्चर, जेसन बेअरँडॉफ, आकाश मधवाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.