IPL 2024 : मिचेल स्टार्कला 24.75 कोटी देऊन फसली KKR? रिंकु सिंगने पाडले पितळ उघडे, Video Viral

Rinku Singh Mitchell Starc IPL 2024 Video : इंडियन प्रीमियर लीग 2024 ची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 मार्चला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत.
Rinku Singh Punishes Most Expensive Player Mitchell Starc in KKR's Practice Game Ahead of IPL 2024
Rinku Singh Punishes Most Expensive Player Mitchell Starc in KKR's Practice Game Ahead of IPL 2024Esakal
Updated on

Rinku Singh Mitchell Starc IPL 2024 Video : आयपीएल 2024 च्या या लिलावात रेकॉर्डब्रेक बोली लावण्यात आली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्यासाठी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले आणि आपल्या ताफ्यात घेतले.

स्टार्कचा आयपीएल रेकॉर्ड काही खास नाही, त्यामुळे दिलेल्या पैशाला तो किती न्याय देऊ शकेल, याबद्दल चाहत्यांना अजूनही शंका आहे. पण यादरम्यान मिचेल स्टार्क एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यात केकेआरचा फिनिशर रिंकू सिंग त्याला गगनचुंबी षटकार मारत आहे.

Rinku Singh Punishes Most Expensive Player Mitchell Starc in KKR's Practice Game Ahead of IPL 2024
IPL 2024 : रोहित-पांड्याच्या वादावर सर्वांचं लक्ष; मात्र 'या' स्टार खेळाडूने दिलं नीता अंबानीना टेन्शन

आयपीएलपूर्वी केकेआरने सराव सामन्याचे आयोजन केले होते. या सामन्यात रिंकू सिंग आणि मिचेल स्टार्क वेगवेगळ्या संघात होते. या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात स्टार्क रिंकू सिंगला गोलंदाजी करत आहे. ज्यामध्ये स्टार्कच्या चेंडूवर रिंकूने फुल टॉस बॉलवर एका गुडघ्यावर बसुन आणि षटकार मारला. आणि स्टार्क चेंडूकडे पाहत राहिला.

Rinku Singh Punishes Most Expensive Player Mitchell Starc in KKR's Practice Game Ahead of IPL 2024
Virat Kohli: 'प्लीज मला त्या नावाने बोलावणं बंद करा...' IPL आधी विराटची फॅन्सला विनंती

त्या सराव सामन्यात स्टार्कची कामगिरी खूपच खराब होती, ज्यात त्याने डावाच्या शेवटच्या षटकात 20 धावा दिल्या. स्टार्कने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 1 बळी घेतला आणि एकूण 40 धावा दिल्या.

कोलकाता नाईट रायडर्स आपला पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 23 मार्च रोजी होणार आहे. संघाचा दुसरा सामना आरसीबी विरुद्ध 29 मार्च रोजी आहे. तिसरा सामना 3 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. यंदा त्यांचा चॅम्पियन कर्णधार गौतम गंभीरही केकेआरमध्ये परतला आहे. गंभीर या संघाशी एक मार्गदर्शक म्हणून जोडला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.