DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Rishabh Pant Viral Video: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान मैदानात अचानक पतंग उडून आला होता, यावेळी काय झालं पाहा.
Rishabh Pant - Rohit Sharma | Mumbai Indians vs Delhi Capitals | IPL 2024
Rishabh Pant - Rohit Sharma | Mumbai Indians vs Delhi Capitals | IPL 2024Sakal
Updated on

Rishabh Pant Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (27 एप्रिल) खेळवला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने 10 धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एक मजेशीर घटना घडली.

झाले असे की या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर 258 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला फलंदाजीला उतरले होते.

Rishabh Pant - Rohit Sharma | Mumbai Indians vs Delhi Capitals | IPL 2024
Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

याच दरम्यान, एक पतंग अचानक उडत मैदानात आला. रोहित शर्माने तो पतंग हातात घेत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतकडे दिला.यावेळी ते काहीतरी बोलतानाही दिसले.नंतर पंतने तो पतंग थोडा उडवण्याचा प्रयत्नही केला. पण पंतगामुळे फारवेळ जायला नको म्हणून पंचांनी तो पंतग ताब्यात घेत खेळ पुढे सुरू ठेवला. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर दिल्लीच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ केला. दिल्लीकडून फ्रेझर-मॅकगर्कने 27 चेंडूत 84 धावा केल्या, ज्यात त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले.

Rishabh Pant - Rohit Sharma | Mumbai Indians vs Delhi Capitals | IPL 2024
IPL 2024 DC vs MI : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

तसेच शाय होपने 41 धावांची आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 48 धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 257 धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजीत मोहम्मद नबी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्युक वूड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईला 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 9 बाद 247 धावा करता आल्या.

मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 63 धावा केल्या, तसेच हार्दिक पांड्याने 46 धावा केल्या. दिल्लीकडून गोलंदाजीत मुकेश कुमार आणि रसिख दार सलाम यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमदने 2 विकेट्स घेतल्या. (Rishabh Pant flying kite)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()