चंडिगड : तब्बल ४५३ दिवसांनंतर अथक प्रयत्न करत रिषभ पंतने केलेले पुनरागमन अपयशी ठरले, पण त्याने दाखवलेली जिगर कौतुकास पात्र ठरली. कर्णधार म्हणूनही तो संघाला विजयी करू शकला नाही. आयपीएलमध्ये शनिवारी झालेला सामना पंजाब किंग्सने ४ विकेटने जिंकला. दिल्ली आणि पंजाब यांच्यातील या सामन्यात सर्व लक्ष पंतवर होते. फलंदाजीत त्याने १३ चेंडूंत १९ धावा केल्या. त्यात दोन चौकार मारले. दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजीत ९ बाद १७४ धावा केल्या. पंजाब संघाने हे आव्हान १९.२ षटकांत पार केले. सॅम करन आणि लिव्हिंगस्टोन यांनी केलेल्या ६७ धावांच्या भागीदारीमुळे पंजाबचा विजय सोपा झाला.
दिल्लीने ८ षटकांत ७४ धावा केल्यावर वॉर्नर बाद झाला आणि रिषभ टाळ्यांच्या गजरात मैदानात आला. त्यावेळी पूर्ण स्टेडियममध्ये त्याला मानवंदना देण्यात आली. रिषभच्या हालचाली कशा होत आहेत याकडे सर्वांचे लक्ष होते, पण एवढ्या मोठ्या अपघातातून आपण वाचल्यानंतरचे त्याचे पुनरागमन सफाईदार होते. एक रिव्हर्स स्वीपचा फटकाही त्याने मारला. त्यानंतर यष्टीरक्षणातही तो चपळ होता. पंजाबच्या जितेश शर्माला त्याने यष्टिचीत करून त्यातीलही चमक त्याने दाखवली.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली : २० षटकांत ९ बाद १७४ (डेव्हिड वॉर्नर २९ -२१ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, मिचेल मार्श २० -१२ चेंडू, २ चौकार, २ षटकार, शेय होप ३३ - २५ चेंडू, २ चौकार २ षटकार, रिषभ पंत १८ -१३ चेंडू, २ चौकार, अक्षर पटेल २१ - १३ चेंडू, २ चौकार, १ षटकार, अभिषेक पॉरेल नाबाद ३२ - १० चेंडू, ४ चौकार, २ षटकार, अर्शदीप सिंग ४-०-२८-२, हरप्रीत ब्रार ३-०-१४-१, हर्षल पटेल ४-०-४७-२) पराभूत वि. पंजाब ः १९.२ षटकांत ६ बाद १७७ (शिखर धवन २२ - १६ चेंडू, ४ चौकार, प्रभसिमरन सिंग २६ -१७ चेंडू, ५ चौकार, सॅम करन ६३ - ४७ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, लिएम लिव्हिंगस्टोन नाबाद ३८ -२१ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, खलील अहमद ४-०-४३-२, कुलदीप यादव ४-०-२०-२).
पॉरेलचा झंझावात
दिल्ली संघाला दीडशे धावा कठीण वाटत असताना इम्पॅक्ट खेळाडू म्हणून नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अभिषेक पॉरेलने अखेरच्या षटकात हर्षल पटेलवर हल्ला करत तब्बल २५ धावा तडकावल्या. त्यामुळे दिल्लीला १७४ धावा करता आल्या.पंजाब संघाचीही सुरुवात ३ षटकांत ३४ अशी वेगवान होती; परंतु इशान शर्माच्या एका षटकात शिखर धवन आणि बेअरस्टॉ (धावचीत) झाले. त्यानंतर रिषभने जितेश शर्माला यष्टिचीत केले, तेव्हा पंजाबची अवस्था ४ बाद १०० अशी झाली होती; परंतु त्यानंतर सॅम करन (६३) आणि लिव्हिंगस्टोन (३८) यांनी ४२ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.