Riyan Parag RR vs DC : राजस्थानचा 'पांढरा हत्ती' कामाला आला; रियाननं गेलेला सामना खेचून आणला

Riyan Parag RR vs DC IPL 2024 : राजस्थाननं रियान परागवर 6 वर्षे विश्वास दाखवला अखेर पठ्ठ्याने विश्वास सार्थ करून दाखवत हंगामाची दमदार सुरूवात केली.
Riyan Parag Contribution Rajasthan Royals
Riyan Parag Contribution Rajasthan Royals esakal
Updated on

Riyan Parag Contribution Rajasthan Royals Defeat Delhi Capitals : राजस्थान गेल्या सहा वर्षापासून रॉयल कारभार करत होती. त्यांनी रियान पराग नावाचा पांढरा हत्ती पाळला होता. हा हत्ती दिसायला छान रूबादार, नखेरल होता. मात्र ऐन कामाच्यावेळी हा हत्ती रणांगणात मान टाकायचा! सर्वांना वाटयचं की राजस्थान रॉयल्सनं हा हत्ती इतकी वर्षं का पाळलाय?

अखेर या पांढऱ्या हत्तीनं आऊटपूट देण्यास सुरूवात केली आहे. तब्बल 6 वर्षानं का होईना हा हत्ती कामाला येतोय. रियान परागनं यंदाच्या हंगामात पहिल्या दोन सामन्यात राजस्थानसाठी भरीव कामगिरी केलीये. त्यामुळं राजस्थाननं हा हत्ती शौक म्हणून पाळला नसून तो त्यांना मोठा फायदा करून देणारा आहे हे अखेर सिद्ध झालं! दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात रियान परागच राजस्थानचा हुकमी एक्का ठरला.

रियान परागची राजस्थानच्या संघात चर्चा असायची. 2019 पासून हा पठ्ठ्या राजस्थानच्या संघात प्लेईंग 11 मध्ये खेळायचा. असं वाटायचं की याचा मोठा विशला आहे त्याशिवाय व्यावसायिक क्रिकेटमधील फ्रेंचायजी याला कसं काय पोसत आहे. रियानची आयपीएलमध्ये 18 ची सरासरी होती.

हा पठ्ठ्या डोमॅस्ट्रिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडायचा मात्र आयपीएलमध्ये याच्या बॅटची धार बोथट झालेली असायची. त्यामुळे हा प्रत्येक हंगामात ट्रोलिंगचा अन् मीम्सचा हक्काच विषय असायचा. मात्र गेल्या दोन वर्षात आसामच्या या डॅशिंग फलंदाजांनं कात टाकायला सुरूवात केली.

रियानचा गेला डॉमेस्ट्रिक हंगाम पाहिला तर यंदा तो आयपीएलमध्ये धमाका करणार असं वाटत होतं. मात्र रियान स्टार म्हणून उदयास येणार असं प्रत्येक आयपीएलच्या सुरूवातीला वाटायचं. अखेर रियानचं खरं गुणवान रूप दिसलं. हंगामाच्या पहिल्याच सामन्यात त्यानं 43 धावांची दमदार खेळी केली. लखनौविरूद्धच्या विजयात कर्णधारासोबत रियाननं देखील मोठा वाटा उचलला.

दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थानची अवस्था 3 बाद 36 धावा अशी झाली असताना रियाननं आधी अश्विनसोबत सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर ध्रुव जुरेलसोबत आक्रमक अर्धशतकी भागीदारी रचत राजस्थानला सन्मानजनक धावसंख्येच्या जवळ पोहचवलं. रियानच्या 45 चेंडूत केलेल्या 84 धावांच्या जोरावर राजस्थान 20 षटकात 185 धावांपर्यंत पोहचली.

रियान परागने 34 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. मात्र खरा रियान 2.0 तर त्यानंतर दिसला! या पठ्ठ्यानं आफ्रिकेचा सर्वात वेगवान गोलंदाज नॉर्खियाला स्टेडियमचा कोपरा अन् कोपरा दाखवला! रियाननं शेवटच्या षटकात तब्बल 25 धावा चोपल्या. त्यानं बघता बघता 45 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी केली. हीच खेळी राजस्थानच्या विजयाची पायाभरणी ठरली.

राजस्थानकडून रियान सोडलं तर इतर एकाही फलंदाजाला 30 धावाही करता आल्या नाहीत. रियानने फलंदाजीत कमाल केली तर गोलंदाजीत राजस्थानच्या विजयात युझवेंद्र चहल आणि शेवटचं षटक टाकणाऱ्या आवेश खाननं मोठं योगदान दिलं. चहलनं 3 षटकात 19 धावा देत 2 बळी टिपले. तर आवेशने 4 षटकात फक्त 29 धावा देत एक विकेट घेतली. दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रिस्टन स्टब्सनं 23 चेंडूत 44 धावा चोपत राजस्थानचं टेन्शन वाढवलं होतं.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.