IPL 2024 : रोहित शर्माला पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार? माजी दिग्गजांचे मोठे विधान

Tom Moody on Rohit Sharma IPL 2024 : मुंबई इंडियन्स संघाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली.
Tom Moody on Rohit Sharma IPL 2024
Tom Moody on Rohit Sharma IPL 2024sakal
Updated on

Tom Moody on Rohit Sharma IPL 2024 : मुंबई इंडियन्स संघाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली. यानंतर हार्दिकच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. या सामन्यानंतर चाहत्यांनी हार्दिकला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले. आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. ज्यावर माजी दिग्गज खेळाडूचे वक्तव्य समोर आले आहे.

Tom Moody on Rohit Sharma IPL 2024
Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule : टीम इंडियाच्या नवीन मालिकेची घोषणा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधी रंगणार कसोटीचा थरार? जाणून घ्या शेड्युल

आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी म्हणाला की, मुंबई इंडियन्सला पहिला सामना हरण्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या नव्या कर्णधाराला थोडा वेळ दिला पाहिजे.

Tom Moody on Rohit Sharma IPL 2024
IPL 2024, Video: पहिल्या विजयानंतर RCB च्या खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये कल्ला, पाहा कसं केलं सेलिब्रेशन

टॉम मूडी म्हणाला की, पाच-आठ सामन्यांनंतर हार्दिकला अचानक कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माला कर्णधार बनवले तर आश्चर्य वाटेल. मला वाटते की मुंबई इंडियन्सने पुढे विचार करून हार्दिकला कर्णधार बनवले आहे. हार्दिकमध्ये लीडच्या सर्व क्षमता आहेत, त्याला थोडा वेळ दिला पाहिजे.

Tom Moody on Rohit Sharma IPL 2024
Virat Kohli: 'आम्ही भारतात नव्हतो, तर...', दोन महिन्यांची विश्रांती अन् मुलाचा जन्म, अखेर विराट झाला व्यक्त

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामना खेळला. मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात हार्दिकही दुखापतीनंतर मैदानात परतला.

मात्र, या सामन्यात हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात फ्लॉप ठरला. गोलंदाजी करताना हार्दिकने 3 षटकात 30 धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. फलंदाजी करताना हार्दिकला केवळ 11 धावा करता आल्या.

दुसरीकडे, रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात हिट ठरला. रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध 45 धावांची तुफानी खेळी केली. यावरून हार्दिकला ट्रोलही करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.