T20 World Cup 2024 Rohit Sharma Hardik Pandya : भारतीय पुरूष क्रिकेट संघ हा आयपीएल 2024 च्या माध्यमातूनच आपली टी 20 वर्ल्डकपची तयारी करत आहे. संघातील जवळपास सर्व खेळाडू हे आयपीएलमध्ये कोणत्या ना कोणत्या संघाकडून खेळत आहेत. त्यामुळे आयपीएलमधील फॉर्म हा देखील एक कळीचा मुद्दा ठरत आहे. भारतीय संघासाठी काही चांगल्या गोष्टी घडत आहेत तर काही खेळाडूंचा फॉर्म चिंतेची बाब ठरत आहे.
संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला यंदाच्या हंगामात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांचा फॉर्म हा टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर बुमराह देखील चांगली गोलंदाजी करत आहे. ही टीम इंडियासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे.
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफमधून पत्ता कट झाला आहे. हार्दिक पांड्या ना फलंदाजीत कमाल दाखवू शकलाय ना गोलंदाजीत त्याला म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.
त्यात हंगामाची चांगली सुरूवात करणाऱ्या रोहित शर्माचा देखील फॉर्म हरपला आहे. जर भारताला आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षाचा दुष्काळ संपवायचा असेल तर संघातील सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असणे गरजेचे आहे.
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे भारताचे अव्वल दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये ते तुफान फॉर्ममध्ये देखील आहेत. विराटने 13 डावात 661 धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आहे. त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत. त्याची सरासरी 66 तर स्ट्राईक रेट हे 155 इतके आहे.
दुसरीकडे जसप्रीत बुमराहने 13 डावात 20 विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या पर्पल कॅप होल्डर आहे. यंदाच्या हंगामातील बुमराह हा मुंबई इंडियन्सचा एकमेव सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. विराट अन् बुमराह फॉर्ममध्ये असणं ही भारतासाठी एक चांगली गोष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.