Yashasvi Jaiswal - Rohit Sharma: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (22 एप्रिल) राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा राजस्थानचा यंदाच्या हंगामातील 8 सामन्यांतील 7 वा विजय आहे. राजस्थानच्या या विजयात यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
दरम्यान, या शतकासह जैस्वालने पुनरागमनही केले. खरंतर आयपीएलपूर्वी जैस्वाल दमदार फॉर्ममध्ये होता. मात्र आयपीएल चालू झाल्यानंतर पहिल्या सात सामन्यांत त्याला एकदाही अर्धशतक झळकावता आले नव्हते.
परंतु, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याला लय सापडली आणि त्याने नाबाद शतक केले. त्याच्या शतकानंतर मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मानेही त्याचे कौतुक केले.
या सामन्यात मुंबईने राजस्थान समोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना जैस्वालने 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 104 धावांची नाबाद खेळी केली. त्याने शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने जाऊन त्याला मिठी मारत त्याचे कौतुक केले. सामन्यानंतरही ते दोघे बोलताना दिसले, याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, जैस्वालने शतक करत आगामी टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील निवडीसाठी दावेदारी ठोकली आहे. त्याला जर भारतीय टी20 संघात जागा मिळाली, तर तो रोहित शर्मासह अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी भारताकडून सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.
सामन्यानंतर सॅमसन म्हणाला, 'मला सुरुवातीपासूनच खेळायला मजा आली. मी याची काळजी घेतली की मी चेंडू निट पाहिल आणि योग्य क्रिकेटिंग शॉट्स खेळेल. जे मी चांगले करतो, तेच मी करण्याचा प्रयत्न केला. काही दिवस चांगले असतात, काही वाईट.'
'मी फार विचार केलेला नाही. मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो की त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाचे आणि विशेषत: संगकारा सरांचे आणि संजू भाईचे मला संधी दिल्याबद्दल आभार मानतो.मी सराव सत्रात माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो आणि मी खूश आहे.
दरम्यान, जैस्वालच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने 18.4 षटकात 1 विकेट गमावत 183 धावा करून मुंबईने दिलेलं 180 धावांचं लक्ष्य पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.