Rohit Sharma MI vs CSK : हिटमॅननं डाईव्ह मारला अन् पँटच... रोहितची झेल घेताना उप्स मोमेंट

Rohit Sharma
Rohit Sharma Oops Moment MI vs CSKesakal
Updated on

Rohit Sharma MI vs CSK : वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज खेळी करत मुंबईसमोर मोठं आव्हान ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला.

दरम्यान, ऋतुराजचे अर्धशतक पूर्ण होण्याआधी मुंबई इंडियन्सला त्याला रोखण्याची संधी होती. सामन्याच्या 12 व्या षटकात माधवालच्या गोलंदाजीवर ऋतुराजने पूल शॉट खेळला होता. मात्र हा फटका सीमापार जाण्याऐवजी रोहितच्या दिशेने गेला. रोहितनेही हा झेल पकडण्यासाठी डाईव्ह मारला. मात्र त्याला झेल पकडता आला नाही.

Rohit Sharma
Philip Salt Video: फक्त फलंदाजीच नाही, तर फिल्डिंगमध्येही सॉल्टचा जलवा; पाहा डाईव्ह मारत कसा पकडला स्टॉयनिसचा कॅच

याचवेळी रोहित शर्माला उप्स मोमेंटचा देखील सामना करावा लागला. डाईव्ह मारला त्यावेळी त्याची पँट खाली सरकली. त्यामुळं रोहित थ्रो करून का पँट सांभाळू या द्विधा मनस्थितीत होता. त्याने चेंडू पटकन थ्रो करून आपली पँट वर घेतली. नशीब रोहित शर्माने पँटच्या आत स्पोर्ट्स टायटी घातली होती.

Rohit Sharma
MI vs CSK Live Score IPL 2024 : रोहितचा शतकी धडाका तरी विजय मात्र चेन्नईचा

जरी रोहित शर्माची पँट खाली आली अन् त्याला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला असला तरी यापेक्षा त्यानं 40 धावांवर खेळणाऱ्या ऋतुराजचा झेल सोडल्याची खंत अधिक असणार. कारण यात ऋतुराजनं पुढे 40 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्यानं शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली अन् सीएसकेला 15.2 षटकात 150 धावांचा टप्पा गाठून दिला.

अखेर हार्दिक पांड्याने ऋतुराजला बाद करत ही जोडी फोडली. मात्र तोपर्यंत त्यांनी मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली होती.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.