MI vs CSK Rohit Sharma Duck : कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून देताना अनेक मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्माचे नाव टी-20 ते वनडे जगभर गाजत आहे. पण आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माची बॅट इतकी शांत राहिली. हिटमॅनच्या शानदार आयपीएल कारकिर्दीवर एक डाग पडला आहे. चेन्नई (CSK vs MI) विरुद्धच्या सामन्यात रोहित सलग दुसऱ्यांदा डक आऊटचा बळी ठरला आहे.
पंजाबविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा 3 चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी, आता सीएसकेविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनने या खेळीची पुनरावृत्ती केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक डक आऊट फलंदाज बनला आहे. या लीगमध्ये रोहित शर्मा एकूण 16 वेळा बाद झाला आहे.
त्याचबरोबर सुनील नरेन, दिनेश कार्तिक आणि मनदीप सिंगसारखे फलंदाज 15 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या मोसमात रोहित शर्माच्या बॅटने 9 सामन्यांमध्ये केवळ एक अर्धशतक खेळी पाहिली आहे.
सीएसकेने मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार धोनीने मैदानात उतरताच आपला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यास वेळ लागला नाही. सीएसकेच्या गोलंदाजांनी येताच कहर केला.
इशान किशन आणि रोहित शर्माला दीपक चहरने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, तर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या इशानला तुषार देशपांडेने आपला शिकार बनवले. पॉवर प्लेमध्येच मुंबईने आपले 3 फलंदाज गमावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.