MI Vs RR : रोहित शर्माने चाहत्यांना केलं नाराज... अन् IPL मध्ये केला हा लाजिरवाणा विक्रम

Rohit Sharma Most Ducks in IPL : आयपीएल 2024 मधील चौदावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माकडून भरपूर चौकार आणि षटकारांची अपेक्षा होती.
Rohit Sharma record for most ducks in ipl MI vs RR News Marathi
Rohit Sharma record for most ducks in ipl MI vs RR News Marathi
Updated on

Rohit Sharma Most Ducks in IPL : आयपीएल 2024 मधील चौदावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माकडून भरपूर चौकार आणि षटकारांची अपेक्षा होती. पण रोहितने चाहत्यांना नाराज केले.

यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक अतिशय लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. सामन्यातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा आऊट झाला. रोहितला राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

Rohit Sharma record for most ducks in ipl MI vs RR News Marathi
IPL 2024 : MS धोनीमुळे CSK टेन्शनमध्ये! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर दिसला लंगडताना; Video Viral

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण रोहितला या सामन्यात अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. आयपीएलमध्ये जसे ट्रेंट बोल्ट पहिल्याच षटकात संघासाठी विकेट घेतो, तसेच या सामन्यातही दिसून आले आहे.

दुसरीकडे, आता आयपीएलमध्ये सर्वाधिक गोल्डन डक बाद होण्याचा लज्जास्पद विक्रम रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. रोहितपूर्वी आरसीबीचा दिनेश कार्तिकही आयपीएलमध्ये 17 वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे.

Rohit Sharma record for most ducks in ipl MI vs RR News Marathi
IPL 2024 : हार्दिक पांड्याविरुद्ध बोलाल तर होणार मोठी कारवाई... मुंबईने लागू केली नवीन नियमावली

आयपीएलमध्ये सर्वाधिक गोल्डन डकवर आऊट झालेले खेळाडू

  • रोहित शर्मा- 17 वेळा

  • दिनेश कार्तिक- 17 वेळा

  • पियुष चावला- 15 वेळा

  • मनदीप सिंग- 15 वेळा

  • ग्लेन मॅक्सवेल- 15 वेळा

  • सुनील नारायण- 15 वेळा

Rohit Sharma record for most ducks in ipl MI vs RR News Marathi
लोकसभा निवडणूक नाही तर 'या' कारणामुळे पुन्हा बदलणार IPL 2024 चे शेड्यूल?

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टकडून अत्यंत धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. बोल्टने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला दोन मोठे धक्के दिले. प्रथम रोहित शर्मा आणि नंतर नमन धीर यांना खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले. पॉवरप्लेमध्येच मुंबई इंडियन्सने आपल्या टॉप-4 फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.