Rohit Sharma : "भाई बंद कर... एक ऑडिओने माझी वाट लावली...." रोहित शर्मा हात जोडून असे का म्हणाला? Video Viral

Rohit Sharma Viral Video MI vs LSG IPL 2024 : काही दिवसाआधी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापूर्वी केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलताना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Rohit Sharma requests with folded hands to switch off camera audio
Rohit Sharma requests with folded hands to switch off camera audiosakal
Updated on

Rohit Sharma Viral Video MI vs LSG IPL 2024 : काही दिवसाआधी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापूर्वी केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलताना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये रोहित म्हणत होता की, “प्रत्येक गोष्ट बदलत आहे… ते त्यांच्या हातात आहे… मी हे मंदिर बांधले आहे. भाऊ, माझे काय, हे शेवटचे आहे....”

Rohit Sharma requests with folded hands to switch off camera audio
Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधील हा शेवटचा हंगामा असल्याची अटकळ सुरू झाली. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीटही करण्यात आला.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहितला अशाच प्रकारचा सामना करावा लागला होता. त्यावेळी रोहित मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीशी बोलत होता. त्यांचे संभाषण रेकॉर्ड होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर रोहितने मजेशीर प्रतिक्रिया दिली. रोहितने हात जोडून विनंती केली, “भाऊ, ऑडिओ बंद कर. आधीच एक ऑडिओने माझी वाट लावली...'

Rohit Sharma requests with folded hands to switch off camera audio
Arjun Tendulkar MI vs LSG : हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जुन झाला रिटायर्ड हर्ट, षटकही नाही केलं पूर्ण

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समध्ये खरेदी केले होते. यानंतर रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. एमआय व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे चाहते प्रचंड संतापले होते. संपूर्ण मोसमात मुंबई कॅम्पमधून खेळाडूंमधील मतभेदाच्या अनेक बातम्या समोर आल्या. त्याचा परिणाम एमआयच्या कामगिरीवरही दिसून आला. या संघाने 17 व्या मोसमात आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत. या काळात 4 मध्ये विजय तर 10 मध्ये पराभव झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.