MI vs DC, IPL: 4,6,6,6,4,6...अबब तब्बल 390 चा स्ट्राईक रेट! वानखेडेवर रोमरियो शेफर्डचे वादळ; पाहा Video

Romario Shepherd Video: मुंबई इंडियन्सच्या रोमरियो शेफर्डने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अखेरच्या षटकात चौकार षटकारांची बरसात करत मुंबईला 234 धावांपर्यंत पोहचवले.
Sakal
Romario Shepherd | IPLSakal
Updated on

Romario Shepherd News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 20 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 234 धावा केल्या.

मुंबईला 230 धावांचा टप्पा पार करून देण्यात रोमारियो शेफर्डने महत्त्वाचा वाटा उचलला. 18 व्या षटकात एन्रिच नॉर्कियाने हार्दिक पंड्याला 39 धावांवर बाद केले. हार्दिक पाचव्या विकेटच्या रुपात बाद झाला. त्यावेळी मुंबईच्या 181 धावा झाल्या होत्या.

हार्दिक बाद झाल्यानंतर शेफर्ड फलंदाजीला आला. त्याच्याबरोबर टीम डेव्हिडही आक्रमक खेळत होता. या दोघांनी 19 व्या षटकात 19 धावा चोपल्या. त्यामुळे मुंबईने 200 धावांचा टप्पा पार केला. यानंतर मात्र शेफर्डने वादळी खेळी केली.

Sakal
S Sreesanth : श्रीसंतविरूद्ध होते पुरावे मात्र विशेष कायदा नसल्यानं... माजी पोलीस आयुक्त नीरज यांनी केला मोठा दावा

20 व्या षटकात दिल्लीकडून नॉर्कियाने गोलंदाजी केली. मात्र या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शेफर्डने चौकार मारला. यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवर लाँग-ऑनला षटकार ठोकला, तर तिसऱ्या चेंडूवरही थेट मैदानाबाहेर षटकार मारला.

इतकेच नाही चौथ्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. यानंतर पाचव्या चेंडूवर शेफर्डने चौकार मारला, तर सहाव्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट खेळत षटकार मारला. त्यामुळे या षटकात त्याने तब्बल 32 धावा ठोकल्या. त्यामुळे मुंबईने 234 धावा धावफलकावर लावल्या.

Sakal
Virat Kohli : विराटच्या कारचा दरवाजा उघडेना, तेवढ्यात फॅनने साधली संधी, मजेशीर Video Viral

यावेळी शेफर्ड 10 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 39 धावांवर नाबाद राहिला. त्याने 390 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याच्यासह डेविड २१ चेंडूत २ चौकार आणि 4 षटकारांसह 45 धावांवर नाबाद राहिला.

तत्पुर्वी मुंबईकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनीही शानदार खेळ केला. रोहितने 27 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावा केल्या. त्याचबरोबर इशानने 23 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावा केल्या.

दिल्लीकडून अक्षर पटेल आणि एन्रिच नॉर्किया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमदने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.