RCB Match Tickets : विराट Vs धोनी! पहिल्याच सामन्यात मोठा धमाका; जाणून घ्या RCB च्या सामन्यांचे तिकीट कसे करायचे बुक?

Royal Challengers Bangalore Match Tickets Booking : रॉयल चॅलेंजर बेंगलोर आयपीएल 2024 च्या पहिल्या सत्रात 5 सामने खेळणार आहे. त्यातील तीन सामने हे होम ग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियमवर होतील.
RCB
RCB ESAKAL
Updated on

RCB Match Tickets Booking : आयपीएलचा 17 वा हंगाम हा 22 मार्चपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने पहिल्या काही सामन्यांचेच शेड्युल जाहीर केलं असून यंदाच्या हंगामाची सुरूवात ही गतविजेत्या आणि उपविजेत्यांच्या सामन्याने होणार नाही. पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्याकडे विराट विरूद्ध धोनी असं देखील पाहिलं जात आहे.

RCB
Car Accident : माजी कर्णधाराचा भीषण अपघात, आलिशान गाडीचा झाला चुराडा अन्...

आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात ही चेन्नईच्या एमएम चिदंबरम स्टेडियमवरून होणार आहे. फाफ ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी आणि धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके या हाय व्होल्टेज सामन्याने हंगामाची सुरूवात होणार आहे.

आरसीबी यंदा हंगामाची सुरूवात चांगली करण्याच्या प्रयत्नात असेल. गेल्या हंगामात त्यांना प्ले ऑफसाठी पात्र होता आलं नव्हतं. यंदाच्या हंगामातील पहिल्या सत्रात आरसीबी 5 सामने खेळणार आहे. त्यांचे तीन सामने हे होम ग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

आरसीबीच्या सामन्यांची तिकीटे कशी खरेदी करायची?

आरसीबीचे होम ग्राऊंडवरील तीन सामने हे पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरूद्ध होणार आहेत. मात्र ही तिकीटे अजून विक्रीसाठी उपलब्ध झालेली नाहीत. याला पेझअॅप युजर्स अपवाद असतील. आरसीबीच्या सामन्यांच्या तिकीटांची सविस्त माहिती अजून देण्यात आलेली नाही. आरसीबीच्या सामन्यांच्या तिकीटाची किंमत ही 3300 ते 9680 रूपयांपर्यंत असणार आहे.

RCB
Ranji Trophy 2024 Winner : रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधी रूपयांचा वर्षाव; विदर्भला देखील मिळार 'इतके' कोटी रूपये

आरसीबीच्या सामन्यांची तिकीटे अशी करा बुक

22 मार्च - CSK vs RCB - सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

तिकीट बूक करण्यासाठीची लिंक : https://in.bookmyshow.com/sports/chennai-super-kings-vs-royal-challengers-bangalore

25 मार्च - RCB Vs PBKS - सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

29 मार्च - RCB Vs KKR - सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

2 एप्रिल - RCB Vs LSG - सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

6 एप्रिल - RCB Vs RR - सामन्याची वेळ सायंकाळी 7.30

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()