RCB vs KKR IPL 2023 : रिंकू सिंहची फटकेबाजी, केकेआरनेच्या 200 धावा

RCB vs KKR IPL 2023
RCB vs KKR IPL 2023 esakal
Updated on

RCB vs KKR IPL 2023 :  कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा 21 धावांनी पराभव करत आपली गाडी पुन्हा विजयी ट्रॅकवर आणली. केकेआरने आरसीबीसमोर विजयासाठी 201 धावांचे आव्हान ठेवले होतो. विराट कोहलीने दमदार अर्धशतक ठोकत पहिल्या 10 षटकातच आरसीबीला शंभरी गाठून दिली होती. त्यावेळी सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. मात्र केकेआरने सामन्यात जोरदार पुनरामन करत आरसीबीची फलंदाजीची तगडी फळी 179 धावात रोखली. वरूण चक्रवर्तीने 4 षटकात 27 धावा देत 3 बळी टिपले. तर सुयश शर्माने आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

केकेआरच्या दमदार सलामीनंतर धावगती थोडी मंदावली होती. त्यामुळे केकेआर 200 चा आकडा पार करणार का याबाबत शंका निर्माण झाली. मात्र रिंकू सिंहने शेवटच्या टप्प्यात तुफान फटकेबाजी करत संघाला 200 च्या जवळ पोहचवले. त्याने सिराज टाकत असलेल्या 19 व्या षटकात 6, 4, 4 अशी धुलाई केली. रिंकूने 10 चेंडूत 18 धावा चोपल्या. तर डेव्हिड विसेने शेवटच्या षटकात 2 षटकार मारत 12 धावा केल्या. केकेआरकडून सलामीवीर जेसन रॉयने सर्वाधिक 56 धावा केल्या.

रिंकूचा धडाका 

त्यानंतर आलेल्या रिंकू सिंहने 19 वे षटक टाकत असलेल्या मोहम्मद सिराजला चांगलेच धुतले. त्याने पहिल्या तीन चेंडूवर एक षटकार आणि दोन चौकार ठोकले. त्यानंतर एक धाव घेत 15 धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर सिराजने आंद्रे रसेलला बाद करत आरसीबीला दिलासा दिला.

अय्यर - राणा बाद 

15 व्या षटकानंतर या दोघांनी धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 80 धावांची भागीदाीरी रचली. मात्र मोक्याच्या क्षणी नितीश राणा 48 धावांवर तर व्यंकटेश अय्यर 31 धावा करून बाद झाला.

केकेआरची धावगती मंदावली.

जेनस रॉय आणि जगदीशन यांनी 83 धावांची सलामी दिल्यानंतर केकेआरची धावगती मंदावली. रॉय 29 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. त्यानंतर जगदीशन देखील 27 धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर आलेल्या व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी भागीदारी रचत संघाला 15 षटकात 132 धावांपर्यंत पोहचवले. मात्र केकेआरची धावगती मंदावली होती.

संथ सुरूवातीनंतर केकेआरचा धडाका

पॉवर प्लेच्या सुरूवातीच्या षटकात संथ फलंदाजी करणाऱ्या केकेआरच्या सलामीवीरींना नंतर धडाकेबाज फलंदाजी करत केकेआरला 6 षटकात बिनबाद 66 धावा चोपल्या. यात जेसन रॉयच्या 20 चेंडूत 48 धावांचा मोठा वाटा होता. तर एन जगदीशनने 16 चेंडूत 17 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकली

फाफ ड्युप्लेसिस पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असून घरच्या मैदानावर आरसीबीची धुरा विराट कोहली सांभाळत आहे. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.