Royal Challengers Bengaluru IPL Play Off Knock Out Stage Record : आयपीएल 2024 च्या लीग स्टेजचे अर्धे सामने झाल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये प्रवेश करेल असा कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र, सलग सहा सामने पराभूत झाल्यानंतर त्यांचे उल्लेखनीय पुनरागमन झाले. त्यांनी सलग सहा सामना जिंकून प्ले ऑफचं आपलं तिकीट नक्की केलं. शेवटच्या लीग सामन्यात आरसीबीने सीएसकेला 27 धावांनी पराभूत केलं. त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी किमान 18 धावांनी सामना जिंकणे आवश्यक होते.
आयपीएलच्या उद्घाटन हंगामापासून आरसीबीचे चाहते पहिल्या विजेतेपदाची वाट पाहत आहेत. आरसीबीने तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु, अंतिम फेरीत विजयी संघाला ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले. आरसीबी हा एक जबरदस्त संघ आहे जो आपले पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक आहे. ते 2009, 2011 आणि 2016 मध्ये तीन फायनलमध्ये आले आहेत.
2009 - आरसीबीने सेमी फायनलमध्ये चेन्नईचा 6 विकेट्सनी पराभव केला होता. मात्र फायनलमध्ये डेक्कन चार्जर्सने त्यांचा 6 धावांनी पराभव केला.
2010 - सेमी फायनलमध्ये मुंबईने आरसीबीचा 35 धावांनी पराभव केला.
2011 - क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईने आरसीबीचा 6 विकेट्सनी पराभव केला. त्यानंतर आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये मुंबईचा 43 धावांनी पराभव करत फायनल गाठली. मात्र फायनलमध्ये चेन्नईने 58 धावांनी विजय मिळवला.
2015 - इलिमिनेटरमध्ये आरसीबीने राजस्थानचा 71 धावांनी पराभव केला होता. मात्र क्वालिफायर 2 मध्ये सीएसकेने 3 विकेट्सने सामना जिंकून आरसीबीचे स्वप्न तोडले होते.
2016 - क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीने 4 विकेट्सनी विजय मिळवला. मात्र फायनलमध्ये हैदराबादने आरसीबीला 8 विकेट्सनी मात दिली.
2020 - इलिमिनेटरमध्ये आरसीबीला हैराबादकडून 6 विकेट्सनी पराभव सहन करावा लागला.
2021 - इलिमिनेटरमध्ये केकेआरने आरसीबीचा 4 विकेट्सनी पराभव केला होता.
2022 - इलिमिनेटरमध्ये आरसीबीने 14 धावांनी सामना जिंकला. मात्र क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानने 7 विकेट्सनी सामना जिंकत फायनल गाठली.
आरसीबीने आतापर्यंत प्ले ऑफमध्ये किंवा बाद फेरीत 14 सामने खेळले आहेत. त्यातील त्यांनी पाच सामन्यात विजय मिळवला आहे तर 9 सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला आहे.
आरसीबीने प्ले ऑफमध्ये 2022 च्या इलिमिनेटर सामन्यात लखनौविरूद्ध सर्वाधिक 2027 धावा केल्या होत्या. ही त्यांची प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसख्या ठरली. तर 2020 च्या इलिमिनेटर सामन्यात हैदराबादविरूद्ध त्यांना फक्त 131 धावा करता आल्या होत्या. ही त्यांची प्ले ऑफमधील निच्चांकी धावसंख्या ठरली.
आरसीबीने 2016 मध्ये गुजरात लायन्सविरूद्ध 159 धावांचे टार्गेट चेस केले होते. हा त्यांचा प्ले ऑफमधील सर्वोच्च चेसिंग स्कोअर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.