IPL 2023 DC vs RR Live : राजस्थानने ठेवलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 9 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने 57 धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 55 चेंडूत 65 धावांची खेळी केली. त्याला ललित यादवने 24 चेंडूत 38 धावा करून चांगली साथ दिली.
मात्र रिली रूसो (14) चा अपवाद वगळता इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने भेदक मारा करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने 2 तर संदीप शर्माने 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, आयपीएल 2023 च्या 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी करण्यास सांगितले. राजस्थानकडून फक्त तीनच फलंदाजांना दुेहरी आकडा पार करता आला. मात्र या तिघांनी मिळूनच दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 200 धावांचे मोठे आव्हान उभे केले. राजस्थानकडून जॉस बटलरने 79, यशस्वी जैसवालने 60 तर हेटमायरने 39 धावांची खेळी केली. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 बळी टिपले.
राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दिल्लीला दुहेरी दणका दिला. त्याने सलामीवीर पृथ्वी शॉला शुन्यावर बाद केले. त्यानंतर मनिष पांडेला देखील पुढच्या चेंडूवर बाद करत दुसरा धक्का दिला. पहिल्याच षटकात बोल्टने 2 विकेट्स घेत षटक निर्धाव टाकले.
जॉस बटलरने 51 चेंडूत 79 धावांची खेळी करत राजस्थानला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. मात्र इनिंगच्या 19 व्या षटकात मुकेश कुमारने त्याला बाद केले.
यशस्वी जैसवाल 60 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन क्रिजवर आला. मात्र कुलदीप यादवने संजू सॅमसनला शुन्यावर बाद केले. पाठोपाठ रियान पराग देखील 7 धावा करून रोव्हमन पॉवलेच्या गोलंदाजीवर बाद झाला.
यानंतर सलामीवीर जॉस बटलरने अर्धशतकी खेळी करत संघाला 15 व्या षटकात 130 धावांच्या पार पोहचवले.
पॉवर प्लेनंतरही यशस्वी जैसवालने आपला धडाका कामय ठेवत दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने बटलरसोबत 9 व्या षटकातच राजस्थानला 98 धावांपर्यंत पोहचवले. अखेर जैसवालची 31 चेंडूत केलेली 60 धावांची खेळी मुकेश कुमारने संपवली.
राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने खलील अहमदच्या पहिल्याच षटकात 5 चौकार हाणत दमदार सुरूवात केली. या पहिल्या षटकाच्या जोरावर राजस्थानने 6 षटकात 68 धावांपर्यंत मजल मारली. त्यात यशस्वीच्या 41 तर बटलरच्या 25 धावांचे मोठे योगदान होते.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. जैस्वालने पहिल्याच षटकात खालीलवर तुटून आणि पाच चौकार मारत 20 धावा ठोकल्या.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, रिले रुसो, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, एनरिच नोर्टजे, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर राजस्थान संघातही दोन बदल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.