IPL 2023 Points Table Latest Updates: आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी चढउतार आहे. आयपीएल 2023 ची चमकदार ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व 10 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023 मध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला.
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर आयपीएल 2023च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाली. पंजाब किंग्जला जबरदस्त फायदा झाला आहे आणि ते आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
आयपीएल 2023च्या हंगामातील पंजाब किंग्जचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह पंजाब किंग्जचा नेट रनरेट +0.311 झाला असून तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेला गुजरात टायटन्स संघ अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचे सलग दोन विजयानंतर 4-4 गुण आहेत, पण नेट रनरेटच्या बाबतीत हार्दिक पांड्याचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. गुजरात टायटन्सचा निव्वळ रनरेट +0.700 आहे.
या पॉइंट टेबलमध्ये कोणत्याही टीमला टॉप 4मध्ये स्थान मिळेल, केवळ त्यांनाच प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत प्रत्येक धावसंख्या आणि धावगती अत्यंत महत्त्वाची ठरते.
तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 2 गुण मिळाले आणि त्यांचा निव्वळ धावगती +1.981 आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दुसरा सामना KKR विरुद्ध आहे, जर RCB हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर ते अव्वल स्थानावर पोहोचेल. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 149 धावा केल्यानंतर ऑरेंज कॅपमध्ये आघाडीवर आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुड पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आतापर्यंत आयपीएल 2023 च्या दोन सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.