IPL 2023 Sanju Samson: संजूच्या डोक्यात होतं काय? बटलर ऐवजी अश्विन आला सलामीला...

बटलरच्या जागी यशस्वीसोबत सलामीला आला रविचंद्रन अश्विन, कॅप्टन संजूने सांगितले कारण
IPL 2023 Sanju Samson
IPL 2023 Sanju Samson
Updated on

Sanju Samson on Ashwin Opening Batting : आयपीएलमध्ये बुधवारी पंजाब किंग्जने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना राजस्थानचा संघ केवळ 192 धावाच करू शकला.

त्याचवेळी, या सामन्यात राजस्थानकडून सलामीवीर म्हणून अश्विन यशस्वी जयवालसह मैदानात पोहोचल्याने चाहत्यांना धक्काच बसला. मात्र, आता संजू सॅमसनने अश्विनसोबत ओपनिंग करण्याचे कारण दिले आहे. (Latest Sport News)

IPL 2023 Sanju Samson
IPL 2023: कोण आहे ध्रुव जुरेल? ज्यानं 197 धावा करणाऱ्या पंजाबला रडवलं...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सामन्यानंतर अश्विनसोबत सलामीचे कारण सांगताना सांगितले की, जोश बटलर क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झाला होता. तो फलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता.

कॅच घेताना त्याच्या बोटाला दुखापत झाली. त्याचवेळी पंजाब किंग्जच्या दोन फिरकीपटूंना तोंड देण्यासाठी डावखुरा फलंदाज देवदत्त पडिकलला मधल्या फळीत ठेवायचे होते. त्यामुळेच आम्ही अश्विनला सलामी दिली.

IPL 2023 Sanju Samson
IPL 2023च्या हंगामात फॅन्टसी गेम्स कंपन्यांवर छप्पर फाड पैशांचा वर्षाव! मिळेल इतकी करोड

बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यादरम्यान राजस्थानचा स्टार खेळाडू जोस बटलर क्षेत्ररक्षणादरम्यान झेल घेताना जखमी झाला होता.

पंजाबचा फलंदाज शाहरुख खानचा झेल घेताना बटलरला ही दुखापत झाली. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आगामी सामन्यात तो राजस्थान संघातून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

या दुखापतीमुळे बटलर या सामन्यात ओपनिंग करण्याऐवजी वन डाउन फलंदाजीला आला होता. या सामन्यात बटलरलाही चांगली सुरुवात झाली. मात्र तो 19 धावा करून नॅथन एलिसने बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.