IPL 2024 RR vs RCB : बटलरचं शंभराव्या सामन्यात शतक ठोकलं! आरआरला टॉपवर पोहचवलं

RR vs RCB Live Score IPL 2024 Live Score Updates News : आयपीएल 2024 मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यातील सामन्यात होम टीम आरआरनं आरसीबीचा 6 विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं.
IPL 2024 RR vs RCB Live
IPL 2024 RR vs RCB Live Score Updates Marathi Newssakal
Updated on

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru :

राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा सहा विकेट्सनी पराभव करत आपला चौथा विजय साजरा केला. आरआरनं आरसीबीचं 183 धावांच आव्हान 19 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. बटलरनं 58 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने 69 धावांची खेळी करत बटलरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी रचली.

जॉस बटलरचे हे शंभराव्या सामन्यातील शतक खास ठरलं. आयपीएलमध्ये 100 व्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो केएल राहुलनंतरचा दुसराच खेळाडू ठरला. आरआरनं सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. त्यांनी केकेआरला मागं खेचलं. तर आरसीबीने पराभवाचा चौकार मारला.

आयपीएलच्या 19 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 183 धावा ठोकल्या. विराट कोहलीने हंगामातील पहिले शतक ठोकत 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 44 धावा केल्या. या दोघांनी 125 धावांची सलामी दिली. मात्र विराट कोहलीने दमदार शतक ठोकूनही आरसीबीला 200 धावांचा मार्क पार करता आला नाही. त्यांची गाडी पुन्हा 183 धावांवर अडकली.

IPL 2024 RR vs RCB : बटलरचं शंभराव्या सामन्यात शतक ठोकलं! आरआरला टॉपवर पोहचवलं

राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा 6 विकेट्सनी पराभव केला. जॉस बटलरने 100 धावांची खेळी केली. याचबरोबर आरआरने गुणतालिकेत केकेआरला मागं टाकत अव्वल स्थान गाठलं.

संजू अन् बटलरचा धुमाकूळ

संजू सॅमसन आणि जॉस बटलरने दुसऱ्या विकेटसाठी 148 धावांची दमदार भागीदारी रचली. या जोरावर राजस्थानने सामन्यावर पकड निर्माण केली. संजू 42 चेंडूत 69 धावा करून बाद झाल्यानंतर बटलरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र रियान पराग आणि ध्रुव जुरेल हे स्वस्तात माघारी गेले.

IPL 2024 RR vs RCB Live Score : आरआरचं आरसीबीला चोख प्रत्युत्तर; 8 षटकात चोपल्या 80 धावा

राजस्थान रॉयल्सने देखील आरसीबीच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चोख प्रत्युत्तर दिलं. यशस्वी जयस्वाल शुन्यावर बाद झाल्यानंतर जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांनी 9 षटकात 84 धावा चोपल्या. बटलर 48 तर संजू नाबाद 35 धावा करून खेळत आहेत.

IPL 2024 RR vs RCB Live Score : विराट कोहलीची शतकी खेळी मात्र तरी आरसीबीची गाडी 183 धावांवर अडकली

विराट कोहलीने आयपीएलमधील आपले आठवे शतक ठोकले. याचबरोबर विराट कोहली हा यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला. मात्र विराटने 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी करू देखील आरसीबी 20 षटकात 183 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

पुन्हा विराट कोहलीच शो

आरसीबीच्या विराट कोहलीने 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली. मात्र तरी देखील राजस्थानने आरसीबीला 20 षटकात 3 बाद 183 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. फाफ ड्युप्लेसिस पुन्हा फॉर्ममध्ये आला असून त्यानं 44 धावांची खेळी करत विराटसोबत शतकी सलामी दिली.

IPL 2024 RR vs RCB Live Score : विराट कोहलीचं अर्धशतक, फाफचीही समर्थ साथ; आरसीबी शतक पार

आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांची जोडी अखेर क्लिक झाली. राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात या दोघांनी नाबाद शतकी भागीदारी रचली. विराट कोहलीने 43 चेंडूत 59 धावा केल्या तर ड्युप्लेसिस 41 धावा करून नाबाद होता. या दोघांनी आरसीबीला 12 व्या षटकात 108 धावांपर्यंत पोहचवलं.

आरसीबीची दणक्यात सुरूवात 

आरसीबीने राजस्थानविरूद्ध दणक्यात सुरूवात केली. त्यांनी पॉवर प्लेच्या 5 षटकात जवळपास 10 च्या सरासरीने धावा करत बिनबाद 45 धावा केल्या. यात विराटचा 26 तर ड्युप्लेसिसचा 12 धावांचा वाटा होता.

राजस्थानने नाणेफेक जिंकली

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही. तर आरसीबीने आपल्या संघात एक बदल केला आहे. सौरव चौहान आरसीबीकडून पदर्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.