IPL 2023: ऋतुराज गायकवाडचे थोडक्यात हुकले शतक! ४ चौकार ९ गगनचुंबी षटकार... ठोकल्या ९२ धावा

ऋतुराजच्या 13 चेंडूत 70 धावा! तरी पांड्याच्या गुजरातने चेन्नईच्या मुसक्या आवळल्या
Ruturaj Gaikwad century was missed 4 fours 9 towering sixes struck 92 runs Chennai Super Kings ipl 2023
Ruturaj Gaikwad century was missed 4 fours 9 towering sixes struck 92 runs Chennai Super Kings ipl 2023 sakal
Updated on

Ruturaj Gaikwad IPL 2023 : आयपीएलच्या १६ व्या हंगामाची दणदणीत सुरवात करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे शतक मात्र आठ धावांनी हुकले. गत- विजेत्या गुजरात संघाविरुद्धच्या सलामीच्या साम- न्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ७ बाद १७८ अशी मजल मारली.

सलामीला खेळणाऱ्या ऋतुराजने कमालीची फलंदाजी केली. चार चौकार आणि नऊ षटकारांची आतषबाजी करताना त्याने ५० चेंडूतच ९२ धावा. ऋतुराजचा झंझावात सुरू असताना चेन्नईचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असे चित्र होते. परंतु बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा यांनी निराशा केली.

Ruturaj Gaikwad century was missed 4 fours 9 towering sixes struck 92 runs Chennai Super Kings ipl 2023
GT vs CSK IPL 2023 : दोन मराठी पोरं लढली, मात्र अखेरच्या षटकात गुजरातची झाली सरशी

शुभमन गिल आणि अंतिम क्षणी रशीद खानने केलेल्या फटकेबाजीमुळे गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपर किंम्सचा पाच विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडच्या ९२ धावांची खेळी व्यर्थ ठरली.

सामना अखेकरच्या घटकापर्यंत रंगला असला तरी गुजरातचे वर्चस्व होते. गिलने ३६ चेंडूत ६३ धावा करून गुजरातला एक पाउल पुढे ठेवले होते. अंतिम क्षणी चुरस निर्माण झालेली असताना रशीद खानने ३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.

Ruturaj Gaikwad century was missed 4 fours 9 towering sixes struck 92 runs Chennai Super Kings ipl 2023
IPL 2023 GT vs CSK : गतविजेत्या गुजरातची विजयी सुरूवात; चेन्नईची कडवी झुंज मोडून काढत जिंकला सामना

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शर्माने शानदार सुरवात करताना डेव्हन कॉनवेच्या यष्टी उखडल्या, पण त्यानंतर ऋतुराजचा तडाखा रोखणे शमीलाही कठीण गेले. ऋतुराजने सुरवातीपासून हल्लाबोल केला त्यामुळे चेन्नईची सुरवात दहा धावांच्या सरासरीने झाली. मात्र मोईन खान आशा निर्माण करून बाद झाल्यावर भरवशाच्या बेन स्टोक्सने निराशा केली.

अंबाती रायडू आणि बढती मिळालेला शिवम दुबे फार काही करू शकले नाहीत मात्र रवींद्र जडेजाचे अपयश चेत्रईला अपेक्षित धावांना ब्रेक लावणारे होते. ९२ धावा करून ऋतुराज बाद झाला तेव्हा चेन्नईच्या खात्यात १५१ धावाच झाल्या होत्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकात १ पटकार आणि १ चौकार मारला त्यामुळे चेन्नईला १७८ धावा करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.