CSK vs KKR : केकेआरचा विजयी रथ सीएसकेने रोखला; बालेकिल्ला अभेद्य ठेवला!

Ruturaj Gaikwad MS Dhoni
Chennai Super Kings Defeat Kolkata KnightEsakal
Updated on

Ruturaj Gaikwad Shine Chennai Super Kings Defeat Kolkata Knight : आयपीएलच्या 17 व्या हंगामात गौतम गंभीरच्या मेंटॉरशिपखाली खेळणारी केकेआर भलत्याच फॉर्ममध्ये होती. हंगामातील सुरूवातीचा होम ग्राऊंड होम टीम जिंकणार! हा ट्रेंड सुरू होता. मात्र केकेआरनं होम ग्राऊंडवर होम टीमला आम्ही लोळवणार असा नवा ट्रेंड सुरू केला. केकेआरनं आधी आरसीबीला आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरात धुव्वा उडवला होता.

Ruturaj Gaikwad MS Dhoni
CSK vs KKR : सीएसकेचा कर्णधार चमकला; विजयी चौकार मारत केकेआरला दिला पहिला पराभवाचा धक्का

आज चेन्नई सुपर किंग्जच्या घरात केकेआर घुसणार होती. सुनिल नारायण, आंद्रे रसेल, रिंकू सिंह या धडाकेबाज फलंदाजांच्या कळपात आता नवा भिडू अंगक्रिश रघुवंशी दाखल झाला होता. तिकडं सीएसकेमध्ये ऑल इज वेल नव्हतं. सलामी जोडी म्हणावी तशी चमकली नव्हती. ऋतुराज कर्णधार झाल्यापासून त्याची बॅट तळपली नव्हती. त्याला डावखुऱ्यांचं वावडं आहे की काय असं वाटू लागलं होतं. त्यात केकेआरचा मिचेल स्टार्क त्याची वाट लावण्यासाठी बसला होताच.

मात्र ऋतुराजनं नाणेफेक जिंकली अन् सीएसकेनं अर्धी लढाई तिथंच जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा तुषार देशपांडेनं पहिल्याच चेंडूवर योग्य ठरवला. त्यानं सॉल्टला बाद करत केकेआरच्या मनसुब्यांमध्ये मिठाचा खडा टाकला. एरवी पॉवर प्लेमध्ये सामन्याचा टोन सेट करणाऱ्या केकेआरला सीएसकेच्या गोलंदाजांनीच सेट केलं होतं.

धावांचा पाऊस पाडणाऱ्या सुनिल नारायणला पहिल्यांदाच धावांच्या दुष्काळाचा सामना करावा लागला. तो 20 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. अंगक्रिशनं सीएसकेचं टेन्शन वाढवलं होतं. 18 चेंडूत 24 धावा चोपणाऱ्या या रघुवंशीला राजपूत जडेजानं पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर जडेजानं कमाल केली. त्यानं नारायण, रघुवंशीसह व्यंकटेश अय्यरची देखील शिकार केली. त्याला देशपांडेनं 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तिक्षाणा अन् फास्ट बॉलर कम स्पिनर असलेल्या मुस्तफिजूरनं उत्तम साथ दिली. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर सोडला तर इतर फलंदाज तग धरू शकले नाहीत. अय्यरनं देखील मोठी नाही पण 34 धावांची खेळी केली.

Ruturaj Gaikwad MS Dhoni
IPL 2024, Video: चेपॉकवर जडेजा शो! पहिल्याच चेंडूवर कॅच घेतला अन् मग 3 विकेट्स घेत KKR च्या ताफ्यात उडवली खळबळ

केकेआरने सीएसकेसमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं. होम ग्राऊंडवर सीएसकेसाठी हे आव्हान फार तोकडं होतं. कारण ग्राऊंडवर दव पडलं होतं अन् आता गोलंदाजी करणं सोपं नव्हतं. त्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडला लो स्कोअरिंग सामन्याचं गणित पक्क माहिती असल्यानं तो खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता.

त्याच्या अवती भवती येणाऱ्या फलंदाजांनी रनरेट वाढवण्याची जबाबादारी आपल्या खांद्यावर घेतली. डॅरेल मिचेलने 18 चेंडूत 25 तर शिवम दुबेने 19 चेंडूत 28 धावा ठोकल्या. ऋतुराजनं 58 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी करत एक एन्ड सेफ करून ठेवला होता.

अखेर विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी धोनीला मैदानावर यावं लागलं. मात्र अवघ्या तीन धावांसाठी आलेल्या धोनीनं एकेरी धाव घेत चाहत्यांची थोडी चेष्टाच केली. अखेर ऋतुराजनं विजयी चौकार मारत आता आपण सीएसकेचा कर्णधार आहे हे दाखवून दिलं.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.