CSK vs RCB Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड आज रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच नाणेफेक करण्यासाठी आला. यावेळी त्याला धोनीची जागा घेतल्यावर कसं वाटतं हा स्वाभाविक प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ऋतुराजने वेगळं उत्तर देत आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवलं.
आयपीएलचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात चेपॉक स्टेडियमवर होत आहे. हे गतविजेत्या सीएसकेचे होम ग्राऊंड आहे. या सामन्यापूर्वीच सीएसकेने आपला कर्णधार बदलला. धोनीने नेतृत्वाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर दिली.
नाणेफेकीवेळी ऋतुराजला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ऋतुराज म्हणाला, 'हा माझा सन्मानच आहे. पण मी कोणाचीही जागा भरून काढण्याचा प्रयत्न करणार नाही. मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या आकलनानुसार नेतृत्व करणार आहे. मी सीएसकेचा कर्णधार होणार हे गेल्या आठवड्यात समजले. तशी गेल्या वर्षी माही भाईने हिंट दिली होती. आमच्या संघात भरपूर अनुभवी खेळाडू आहेत.'
पहिल्या सामन्यातील प्लेईंग 11 बाबत बोलताना ऋतुराज म्हणाला की, 'दुर्दैवाने आम्ही पथिराना आणि कॉनवेला मिस करणार आहोत. आम्ही विदेशी खेळाडू म्हणून रविंद्र रचिन, मिचेल, फिझ आणि तिक्षाणा यांना खेळवत आहोत. याचबरोबर समीर रिझवान हा देखील पदार्पण करणार आहे. खेळपट्टी चांगली दिसत आहे. दुसऱ्या डावात मात्र चेंडू थांबून येण्याची शक्यता आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.