MS Dhoni CSK IPL 2024 Ruturaj Gaikwad : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने मोठा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीच्या जागी युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. म्हणजेच 17 व्या सत्रात धोनी एक खेळाडू म्हणून मैदानावर दिसणार आहे. अशा परिस्थितीत धोनीचा हा शेवटचा सीझन आहे की काय, अशी अटकळ बांधली जात आहे.
यासोबतच चेन्नईच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आयपीएल 2024 हा महेंद्रसिंग धोनीसाठी शेवटचा हंगाम असू शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावरही जोर धरू लागली आहे.
धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाला, जेणेकरून चेन्नई संघाला गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळण्याची सवय लागावी. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवणे सीएसकेची चूक असल्याचे चाहते बोलत आहेत. पण असे का बोले जात आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगतो....
ऋतुराज गायकवाड याआधी चेन्नई सुपर किंग्सने हा सट्टा भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर खेळला होता. मात्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.
या कारणामुळे खेळाडूने स्वतःच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा कर्णधार बनवण्यात आले. अशा स्थितीत महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद काढून ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवणे ही चेन्नईची मोठी चूक असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी सोपवून चेन्नईने योग्य की चूक केली हे स्पर्धा सुरू झाल्यानंतरच कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.