Sachin Tendulkar Shubman Gill: शुभमनच्या या गुणांमुळे... खुद्द सचिनने भलीमोठी पोस्ट करत केलं तोंडभरून कौतुक

Sachin Tendulkar Praises Shubman Gill
Sachin Tendulkar Praises Shubman Gill esakal
Updated on

Sachin Tendulkar Praises Shubman Gill : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने यंदाच्या हंगामात शतकांचा रतीबच घातला आहे. त्याने आतापर्यंत तीन शतकी खेळी केली असून 16 सामन्यात 851 धावा केल्या आहेत. गिलने आरसीबीविरूद्ध 104 धावांची दमदार खेळी करत मुंबईला प्ले ऑफमध्ये पाठवले. त्यानंतर मुंबईविरूद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात 129 धावांची तडाखेबाज खेळी करत त्यांचे फायनल खेळण्याचे स्वप्न अधुरे ठेवले.

दरम्यान, शुभमन गिलवर संपूर्ण क्रीडा जगतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र त्याच्या दृष्टीने सचिन तेंडुलकरने त्याचा पाठ थोपटणे हे सर्वश्रेष्ठ असेल. सचिनने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट लिहीत शुभमन गिलचे तोंडभरून कौतुक केले आहे.

सचिने आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, 'शुभमन गिलसाठी यंदाचा हंगाम हा स्मरणीय ठरला आहे. त्याच्या दोन शतकाने मोठा परिणाम घडवून आणला. पहिल्या शतकाने मुंबईच्या आशा पल्लवीत झाल्या आणि दुसऱ्या शतकाने मुंबईचे स्वप्न धुळीस मिळाले. हे अनिश्चित क्रिकेटची प्रवृत्ती आहे.'

Sachin Tendulkar Praises Shubman Gill
IPL Final 2023 : पन्नासपेक्षा जास्त कॅमेरे असणार तैनात; आयपीएलची फायनल दिसणार दमदार

'शुभमनच्या टेम्प्रामेंट, अत्यंत शांतपणा, धावांसाठीची भूक आणि रनिंग बिटविन द विकेट या गोष्टींनी मला प्रभावित केले. धावांचा पाऊस पडणाऱ्या सामन्यात काही क्षण सामन्याला कलाटणी देणाऱ्या ठरतात. शुभमन गिलने 12 व्या षटकानंतर ज्या प्रकारे धावांची गती वाढवली तो क्षण सामन्याला कलाटणी देणारा ठरला. यामुळे गुजरातला दमदार धावसंख्या उभारता आली. गिलकडे किती क्षमता आहे हे या खेळीने दाखवून दिले. त्याच्या या खेळीचा सामन्यावर प्रभाव पडला. मुंबईच्या तिलक वर्मा, सूर्यकुमार यादवने आशा जिवंत ठेवल्या होत्या.'

आता फायनल सामना पाहणे खूप रंजक ठरणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.