Sam Curran and Faf du Plessis Fined : आयपीएल 2024 मध्ये रविवारी दोन सामने खेळल्या गेले. या दिवशी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला. केकेआरने हा रोमांचक सामना जिंकला. याशिवाय दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात पंजाब किंग्जचा दारूण पराभव झाला.
त्याचबरोबर पराभूत कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि सॅम करन यांच्यावरही आयपीएलकडून मोठी कारवाई करण्यात आली. दोघांनाही दंड ठोठावण्यात आला. फाफ डू प्लेसिसला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता, तर सॅम करनला पंचांशी वाद घातल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड भरावा लागला होता.
खरंतर, आरसीबी संघ निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही आणि यामुळे त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मोसमात संघाची ही पहिली चूक आहे.
सॅम करनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला होता आणि त्यामुळेच त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. सॅम करनला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलकडून एक निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
रविवारच्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 222 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ केवळ 221 धावा करू शकला आणि त्यांना अवघ्या एका धावेने सामना गमवावा लागला. या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम खेळणारा पंजाब किंग्ज संघ 20 षटकात 142 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 19.1 षटकांत 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. टायटन्सच्या वतीने कर्णधार शुभमन गिलने 29 चेंडूत 35 धावा, साई सुदर्शनने 31 धावा आणि राहुल तेवतियाने 18 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयाकडे नेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.