IPL 2022 : इंग्लंडच्या सॅम करनने बोलून दाखवली 'अस्वस्थता'

Sam Curren says it's difficult to sit at home and watch IPL
Sam Curren says it's difficult to sit at home and watch IPL esakal
Updated on

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि गेल्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) हुकमी एक्का सॅम करन (Sam Curran) आयपीएलमध्ये खेळू शकत नसल्याने अस्वस्थ आहे. 23 वर्षाच्या अष्टपैलू सॅमने चेन्नई सुपर किंग्जसाठी गेल्या काही हंगामापासून चांगली कामगिरी केली होती. मात्र यंदाच्या हंगामात सॅम करनने दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2022) माघार घेतली आहे. सॅम करनला स्ट्रेच फॅक्चर आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या सत्रावेळी त्याला ही दुखापत झाली होती.

Sam Curren says it's difficult to sit at home and watch IPL
IPL 2022 : मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा; दुसऱ्या सामन्यापूर्वी रोहित टेन्शन फ्री

सॅम करन या दुखापतीमुळे टी 20 वर्ल्डकप आणि अॅशेस मालिका देखील खेळू शकला नव्हता. तो आयपीएलच्या 15 व्या हंगामात पुनरागमन करेल असे वाटत होते. मात्र इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल स्टाफने त्याला 2022 च्या मेगा लिलावात आपले नाव रजिस्टर न करण्याचा सल्ला दिला होता. आयपीएल ही जगातील अव्वल दर्जाची टी 20 लीग म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या आयपीएलचा भाग होऊ न शकणे हे अस्वस्थ करणारे आहे.

Sam Curren says it's difficult to sit at home and watch IPL
बुमराह-विराटची गोष्ट चाहत्यांना खटकली; पार्थिवनं ट्रोलर्संना दिलं असं उत्तर

याबाबत इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना करन म्हणाला, 'मी आयपीएल खेळत नाही आणि घरात बसून सामने पाहत आहे यामुळे खूप निराशा होते. मला लिलावात सामिल व्हायचे होते. मात्र शेवटी मी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. मला वाटते की हा चांगला निर्णय आहे. तसं बघायला गेलं तर आयपीएलचा 15 वा हंगाम फारच लवकर आला.'

सॅम करन पुढे म्हणाला का 'मी जोखीम घेऊन आयपीएलमध्ये सामिल झालो असतो. तर मी तेथे गोलंदाजी करत असतो. मी खूप तरूण खेळाडू आहे त्यामुळे मी अजून एकदा दुखापतग्रस्त होण्याचा धोका पत्करू घेऊ इच्छित नव्हतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.