IPL 2024, Video: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या शर्मानं मारला पंजा, सूर्या-ईशानलाही धाडलं माघारी; पाहा कशा घेतल्या 5 विकेट्स

Sandeep Sharma 5 Wickets Haul: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने 5 विकेट्स घेत मोठा पराक्रम केला.
Sandeep Sharma | Rajasthan Royals | IPL 2024
Sandeep Sharma | Rajasthan Royals | IPL 2024Sakal
Updated on

Rajasthan Royals vs Mumbai Indians IPL: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील (IPL) 38 वा सामना सोमवारी (22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळवला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात राजस्थानकडून संदीप शर्माने शानदार गोलंदाजी केली.

संदीपने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 18 धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

Sandeep Sharma | Rajasthan Royals | IPL 2024
Hardik Pandya IPL: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कॅप्टन हार्दिकचा मलिंगाकडून सन्मान, जाणून घ्या कारण

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, राजस्थानकडून ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात रोहित शर्माला बाद केल्यानंतर संदीप शर्माने पॉवर-प्लेच्या 6 षटकांत मुंबईला दोन मोठे धक्के दिले.

त्याने आधी ईशान किशनला शुन्यावरच बाद केले. त्यानंतर धोकादायक सूर्यकुमार यादवला त्याने 10 धावांवर माघारी पाठवले.

त्यानंतर संदीपने डावाच्या अखेरच्या षटकात आणखी धारदार गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. त्याने आधी 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्धशतक करणाऱ्या तिलक वर्माला रोवमन पॉवेलच्या हातून झेलबाद केले.

त्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर जेराल्ड कोएत्झीला शुन्यावर बाद केले. यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर टीम डेविडला रियान परागच्या हातून झेलबाद करत 5 विकेट्स पूर्ण केल्या.

Sandeep Sharma | Rajasthan Royals | IPL 2024
Yuzvendra Chahal IPL: मुंबईविरुद्धच्या सामन्यात चहलने रचला इतिहास; 'हा' भीम पराक्रम करणारा बनला पहिलाच गोलंदाज

त्याच्या या 5 विकेट्समुळे मुंबईला 20 षटकात 9 बाद 179 धावांवर रोखण्यात राजस्थानला यश मिळाले.

राजस्थानसाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी

तसेच राजस्थानसाठी संदीपने तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदवली आहे. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सोहेल तन्वीर आहे. त्याने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जयपूरमध्ये 14 धावा खर्च करताना 6 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉकनर आहे. त्याने 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 16 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर संदीप आला आहे. (Sandeep Sharma 5 Wickets Haul)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.