Sandeep Sharma : लाईन क्रॉस केली की असंच असतं! संदीपनंच जिंकून दिलेला सामना संदीपमुळेच राजस्थानने हरला

Sandeep Sharma RR vs SRH
Sandeep Sharma RR vs SRH Esakal
Updated on

Sandeep Sharma RR vs SRH : लाईन क्रॉस करण्याचे किंमत काय असू शकते हे आजच्या राजस्थान विरूद्ध हैदराबादच्या सामन्याने सर्वांना शिकवले. तुम्ही कितीही झुंजारपणे विजय मिळवला तरी तो नियमात बसणारा असला तरच तो पचतो. नियम मोडला तरी तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. राजस्थानने आज लाईन क्रोस करण्याची मोठी किम्मत मोजली. हैदराबादने शेवटच्या चेंडूवर षटाकार ठोकत राजस्थानचे 215 धावांचे मोठे आव्हान पार करत सामना 4 विकेट्सनी जिंकला.

यामुळे राजस्थानच्या प्ले ऑफ खेळण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का पोहचला आहे. ते जरी 11 सामन्यातीली 5 सामने जिंकून 10 गुण घेत चौथ्या स्थानावर असले तरी आता त्यांच्याकडे फक्त 3 सामने शिल्लक असून जरी त्यांनी तीनही सामने जिंकले तरी त्यांचे 16 च गुण होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्ले ऑफचे गणित आता जर तर वर जाण्याची दाट शक्यता आहे.

Sandeep Sharma RR vs SRH
Yashasvi Jaiswal : विक्रमवीर यशस्वी! हंगामात धमाका करणाऱ्या जैसवालने ऋषभ पंतलाही टाकलं मागं

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुणतालिकेतील तळातील संघ सनराईजर्स हैदराबादने राजस्थानला पराभवाचा धक्का दिला. राजस्थानच्या 215 धावांचे आव्हान पार करताना हैदराबादने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला होता. हैदराबादला विजयासाठी 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना संदीप शर्माने अब्दुल समादला झेलबाद केले. मात्र त्यानंतर लगचे नो बॉलचा सायरन वाजला.

हा सायरन फक्त नो बॉलचा राहिला नाही तर तो राजस्थानच्या पराभवाचा भोंगा देखील ठरला. आधीच्या चेंडूवर मैदान सोडलेल्या अब्दुल समादने एका चेंडूत 4 धावांची गरज असताना षटकार मारतच हैदराबादला रोमहर्षक सामना जिंकून दिला. मात्र जरी विजय षटकार हा अब्दुल समादने मारला असला तरी हैदराबादच्या विजयाचे श्रेय हे ग्लेन फिलिप्सला जाते.

याचबरोबर 55 धावा करणारा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि 29 चेंडूत 47 धावा करून त्याला उत्तम साथ देणाऱ्या राहुल त्रिपाठीचे देखील या विजयात मोठे योगदान राहिले. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने 4 षटकात 29 धावा देत 4 बळी टिपले. मात्र त्याचीही भेदक गोलंदाजी वाया गेली.

Sandeep Sharma RR vs SRH
Joe Root IPL Debut : 18000 धावा करणाऱ्या इंग्लिश फलंदाजाला अखेर राजस्थानने उतरवले मैदानात

ग्लेन फिलिप्स आणि अब्दुल समाद खेळत होते त्यावेळी हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूत 41 धावांची गरज होती. तसं पहायला गेलं तर सामना राजस्थानच्या पारड्यात गेला होता. मात्र ग्लेन फिलिप्सने 19 वे षटक टाकणारा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवच्या एकाच षटकात तीन षटकार आणि एक चौकार मारत पहिल्या तीन चेंडूतच 22 धावा वसूल केल्या.

मात्र चौथ्या चेंडूवर कुलदीप यादवने 7 चेंडूत 25 धावा ठोकणाऱ्या फिलिप्सला बाद केले. परंतु या षटकात तब्बल 24 धावा झाल्याने सामना 6 चेंडूत 17 धावा असा आला.

शेवटचे षटक टाकणाऱ्या संदीप शर्माने दुसऱ्याच चेंडूवर षटकार खाल्ला. मात्र त्यानंतर त्याने नियंत्रण मिळवत पुढच्या 3 चेंडूत फक्त 4 धावा दिल्या होत्या. आता सामना 1 चेंडूत आणि 5 धावा असा आला. शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने षटकार मारण्याच्या इराद्यात असलेल्या अब्दुल समादला झेलबाद केले.

Sandeep Sharma RR vs SRH
Mohit Sharma GT vs LSG : गुजरातची 'मोहित' करणारी गोलंदाजी! हार्दिकने गेल्या हंगामातील कित्ता याही हंगामात गिरवला

सर्वत्र राजस्थानच्या विजयाचा जलौष सुरू होणारच होता तोपर्यंत नो बॉलचा सायरन वाजला. यामुळे पुन्हा संदीपला शेवटच्या चेंडू टाकण्याचा दबाव सहन करावा लागला. यावेळी टार्गेट हे 1 चेंडू 4 धावा असे होते. समादला फक्त चौकार मारायचा होता. मात्र संदीपच्या चुकीला माफी न देता थेट षटकार मारत हैदराबादला सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध 20 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 214 धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलरने 95 धावांची खेळी केली तर संजू सॅमसनने 66 धावा ठोकत संघाला 200 पार पोहचवले. यशस्वी जैसवालनेही 18 चेंडूत 35 धावांची खेळी करत राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()