"माझा नवरोबांनी आग लावली आग..."; बुमराहच्या 5 विकेट्सनंतर पत्नीचे ट्विट व्हायरल

बुमराहची पत्नी संजना गणेशनही स्टेडियममध्ये उपस्थित राहून पतीच्या 5 विकेट हॉलची साक्षीदार बनली
Sanjana Ganesan tweets after Jasprit Bumrah picks up 5 wicket
Sanjana Ganesan tweets after Jasprit Bumrah picks up 5 wicketSAKAL
Updated on

Jasprit Bumrah IPL 2022: आयपीएलमध्ये विक्रमी पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सला दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 56 व्या सामन्यात 52 धावांनी पराभव केला. आणि आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत ठेवली आहे. मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट्सचा हॉल आपल्या नावावर केला. 'यॉर्कर' स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहने पहिल्या 3 षटकात 5 बळी घेतल्या. त्यानंतर त्याची पत्नी संजना गणेशनने सोशल मीडियावर तिच्या पतीचे कौतुक केले आहे. संजना गणेशन यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत ट्विटरवर तीन फायर इमोजीसह लिहिले, 'माझा नवरा फायर आहे.' संजनाचे हे ट्विट काही वेळातच व्हायरल झाले. (Sanjana Ganesan tweets after Jasprit Bumrah picks up 5 wicket)

Sanjana Ganesan tweets after Jasprit Bumrah picks up 5 wicket
KKR vs MI : मुंबई काही तळ सोडेना! केकेआरने पोहोचली सातव्या स्थानावर

जसप्रीत बुमराह आयपीएल तसंच टी-20 करिअरमध्ये पहिल्यांदाच त्याने 5 विकेट घेतल्या आहे. कालच्या सामन्यात उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने चार षटकांत 10 धावा देत 5 बळी घेतल्या. बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे केकेआरचा संघ 2 बाद 123 धावा वरून 20 षटकांत 9 बाद 165 धावा करू शकला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्स कॅम्प खूप आनंदी दिसत होता. बुमराहची पत्नी संजना गणेशनही स्टेडियममध्ये उपस्थित राहून पतीच्या 5 विकेट हॉलची साक्षीदार बनली.

Sanjana Ganesan tweets after Jasprit Bumrah picks up 5 wicket
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर

केकेआरने पहिल्या 6 षटकात एका विकेटवर 64 धावा केल्या होत्या. मुंबईच्या जसप्रीत बुमराहने केकेआरच्या डावाच्या 15व्या षटकात आंद्रे रसेल आणि फलंदाज नितीश राणाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर 18 व्या षटकात परत आल्यावर पॅट कमिन्स (शून्य), सुनील नरेन (शून्य) आणि शेल्डन जॅक्सन हे त्यांचे बळी ठरले. त्याच्या तिसऱ्या षटकात त्याने तीन विकेट घेत एकही धाव दिली नाही. नाइट रायडर्सचे या विजयासह 12 सामन्यांत 10 गुण झाले आहे. केकेआर सातव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. नाईट रायडर्सच्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 17.3 षटकात 113 धावांत आटोपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.