T20 League IPL : आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू झाला. यंदाच्या हंगामातील बीसीसीआयच्या उत्पन्नापासून ते खेळाडूंच्या बोलीपर्यंत सर्व गोष्टी वाढीवच आहेत. यंदाच्या हंगामातील सामन्यांची संख्या देखील वाढली आहे. निश्चितच सुरूवातीपासूनच आयपीएल ही जगातील एक उच्च दर्जाची सर्वात श्रीमंत अशी टी 20 लीग आहे.
मात्र आयपीएलच्या श्रीमंतीला कडवी प्रतिस्पर्धा करण्यासाठी अजून एक लीग सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौदी अरेबियाने आयपीएल फ्रेंचायजींनी जगातील सर्वात श्रीमंत लीग तयार करण्याची संधी देऊ केली आहे. सौदी अरेबियाने फुटबॉल, फॉर्म्युला वन या सारख्या खेळात मोठी गुंतवणूक केल्यानंतर आता त्यांनी क्रिकेकडे मोर्चा वळवला आहे.
सध्याच्या घडीला बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना इतर देशातील लीगमध्ये सहभागी होण्यास मज्जाव केला आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाच्या सरकारने त्यांच्या देशात नवीन टी 20 लीग सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड आपली भुमिका बदलू शकते.
एजने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षभरापासून या बाबत चर्चा सुरू आहेत. मात्र अद्याप ठोस असं काही घडलेलं नाही. या लीगला आयसीसीकडून मान्यता मिळणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसी चेअरमन ग्रेग बार्सले यांना सौदी अरेबियाचा क्रिकेटमध्ये देखील रस असल्याचे सांगितले होते.
बार्सले म्हणाले की, 'तुम्ही सौदीने लक्ष घातलेल्या इतर खेळांकडे पाहिले तर क्रिकेटमध्ये देखील त्यांचा रस असेल. सौदी अरेबियासाठी क्रिकेटमध्ये गुंतवणूक करणे चांगले ठरेल. ते खेळात चांगली गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचा क्रिकेटमधील सहभाग पाहता ते याकडे लक्ष देणे स्वाभाविक आहे.'
सैदी अरेबियन क्रिकेट फेडरेशन चेअरमन प्रिन्स सौद बीन मिखाल अल - सौद यांनी अरब न्यूजला गेल्या महिन्यात सांगितले होते की, 'आमचा उद्येश हा स्थानिक आणि सौदीमध्ये राहणाऱ्या इतर देशातील लोकांसाठी एक शाश्वत उद्योग उभारणे हा आहे. तसेच सौदी अरेबियाला जगातील एक चांगले क्रिकेटिंग डेस्टिनेशन बनवणे हा देखील आमचा उद्येश आहे.'
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.