IPL 2023 PBKS vs DC : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 15 धावांनी पराभूत झाल्यानंतर पंजाब किंग्स संघ आयपीएलच्या 2023 प्लेऑफ शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन संतापला.
आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेला पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन म्हणाला की, पहिल्या सहा षटकांमध्ये त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकले नाहीत. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 2 बाद 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात 198 धावाच करू शकला. पॉवरप्लेच्या सहा षटकांत दिल्लीच्या फलंदाजांनी बिनबाद 61 धावा केल्या होत्या.
धवन पुढे म्हणाला, 'हे निराशाजनक आहे पण मला वाटते की पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो नाही. त्यावेळी चेंडू पुढे जात असल्याने आम्ही काही विकेट्स घ्यायला हव्या होत्या.
धवन म्हणाला, 'जोपर्यंत लियाम लिव्हिंगस्टोन फलंदाजी करत होते तोपर्यंत आम्ही आशावादी होतो, पण स्पिनरसोबत शेवटचे षटक टाकण्याचा माझा निर्णयही उलटला. त्यापूर्वी पॉवरप्लेमध्ये वेगवान गोलंदाज योग्य ठिकाणी गोलंदाजी करत नव्हते. आम्ही प्रत्येक पॉवरप्लेमध्ये 50-60 धावा देत आहोत आणि विकेट घेऊ शकत नाही. पहिल्या दोन-तीन षटकांत चेंडू स्विंग होईल हे आम्हाला माहीत होते, पण त्याचा फायदा आम्हाला घेता आला नाही.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी झालेल्या आयपीएल 2023 च्या सामन्यात रिले रॉसोच्या 37 चेंडूत नाबाद 82 धावा आणि पृथ्वी शॉचे अर्धशतक (38 चेंडूत 54 धावा) यांच्यामुळे पंजाब किंग्जवर 15 धावांनी रोमांचक विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 213/2 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात 198 धावाच करू शकला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.