Shikhar Dhawan : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने 86 धावांची खेळी करत हंगामाची दमदार सुरूवात केली. यानंतर शिखर धवन पुन्हा एकदा टीम इंडियात परतणार का याबाबत चर्चा सुरू झाली. शिखर धवनने श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मात्र आता त्याला तीनही फॉरमॅटमधील भारतीय संघात स्थान मिळत नाहीये. दुसरीकडे फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये संधी दिली जात आहे.
दरम्यान, एका मालिकेत कर्णधार असलेला शिखर धवन पुढच्या मालिकेत थेट संघातून बाहेर असतो. याबाबत अखेर शिखर धवनने आपले मन मोकळे केले. तो म्हणाला, 'मी आधी संघात खेळत होतो. भारतीय संघाचे नेतृत्व करत होतो. मात्र आता मी संघात नाही. मला संघातून वगळलं आहे. शुभमन गिल सध्या चांगली कामगिरी करत आहे. मी एक दोन मालिकेत चांगली कामगिरी करू शकलो नाही. मला वगळण्यात आले.'
शिखर धवन पुढे म्हणला की, 'मात्र मी आता दुःखी होऊन बसू शकत नाही. मी त्याबाबत आता विचार करत नाही. देवाची माझ्यासाठी जी काही योजना असेल ती माझ्यासाठी चांगलीच असेल. त्यामुळे मला आता त्याबद्दल वाईट वाटत नाही. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नंबर वन असला तरी देखील तुम्ही असुरक्षित असता. मग त्या नंबर वनला काय अर्थ आहे.'
शिखर म्हणतो, 'माझे आयसीसी स्पर्धेतील रेकॉर्ड चांगले आहे. माझी या सारख्या स्पर्धांमधील कमिटमेंट बदललेली नाही. माझी प्रक्रिया कामय तीच राहिली आहे. मला असे वाटते की आयसीसी स्पर्धांमध्ये खेळपट्ट्या चांगल्या असतात. स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी होते त्यामुळे विकेट चागंल्या असतात. मात्र द्विपक्षीय मालिकेत समतोल खेळपट्ट्या नाहीत.'
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.