धवन चौकारांच्या 'शिखरा'वर; ही 'हजारी' रोहित-विराटलाही नाही जमली

Shikhar Dhawan Hit 1000th Four in T20 Cricket
Shikhar Dhawan Hit 1000th Four in T20 CricketESAKAL
Updated on

आयपीएलच्या 16 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्स समोर 190 धावांचे आव्हान ठेवले. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरूवात खराब झाली होती. कर्णधार मयांक अग्रवाल आणि जॉनी बेअरस्टो स्वस्तात माघारी फिरले होते. त्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि लिम लिव्हिंगस्टोनने डाव सावरला. या दोघांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. शिखर धवनने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली. त्याला लिव्हिंगस्टोनची साथ फार काळ देता आली नाही.

Shikhar Dhawan Hit 1000th Four in T20 Cricket
तू फरारी कार आहेस पण; युवा गोलंदाजाला 'स्टेनगन'कडून कानमंत्र

दरम्यान, शिखर धवनने आपल्या या 35 धावांच्या खेळीत 4 चौकार मारले. त्यातील दोन चौकार हे त्याची बॅटची कडा लागून मिळाले होते. मात्र त्यानंतर त्याने 5 व्या षटकात लॉकी फर्ग्युसनला मिड ऑफच्या वरून चौकार मारला. या चौकाराबरोबरच शिखर धवनने टी 20 क्रिकेटमध्ये एक माईल स्टोन पार केला. त्याने टी 20 मधील 1000 वा चौकार मारला. (Shikhar Dhawan Hit 1000th Four in T20 Cricket) भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये चौकारांची हजारी पार करणारा पहिला फलंदाज ठेवला. शिखर धवनने 2007 मध्ये दिल्लीसाठी पहिला टी 20 सामना खेळला होता.

Shikhar Dhawan Hit 1000th Four in T20 Cricket
IPL : उथप्पाला धमकी देऊन मुंबई इंडियन्समधून आरसीबीत केलं होतं ट्रान्सफर

शिखर धवनचा हा 307 वा टी 20 सामना आहे. त्याने 306 सामन्यात 32.47 च्या सरासरीने 8867 धावा केल्या आहेत. भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याच्या यादीत शिखर धवन नंतर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 329 सामन्यात 10312 धावा केल्या आहेत. त्यात 917 चौकार मारले आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानावर रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंत टी 20 सामन्यात 875 चौकार लगावले आहेत.

जागतिक स्तरावर टी 20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार लगावणारा शिखर धवन हा पाचवा फलंदाज आहे. या यादीत सर्वात अव्वल हा ख्रिस गेल आहे. त्याने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 1132 चौकार मारले आहेत. तर इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सने 1054 त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (1005) आणि अॅरोन फिंच (1004) यांचा नंबर लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.