Shikhar Dhawan on Retirement: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संघात पंजाब किंग्सचाही समावेश आहे.
पंजाबला 14 सामन्यांपैकी केवळ 5 सामने जिंकता आले, तर 9 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच त्यांना कर्णधार शिखर धवनच्या दुखापतीचा फटका बसला. आता याबाबत शिखरने प्रतिक्रिया देताना निवृत्तिबद्दलही सुचक विधान केले आहे.
शिखरला आयपीएल 2024 मध्ये पाच सामनेच खेळता आले. तो 9 एप्रिलला सनरायझर्स हैदकाबादविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे नंतर त्याला सामने खेळता आले नाहीत.
त्याच्याऐवजी सॅम करनने पंजाब किंग्सचे नेतृत्व केले. तसेच शेवटच्या सामन्यात करनच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने नेतृत्वाची धूरा सांभाळली.
दरम्यान, पंजाब किंग्स आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर शिखरने एएनआयशी बोलताना त्याच्या निवृत्तीवर भाष्य केले.
तो म्हणाला, 'मी सुद्धा एका बदलातून जात आहे जिथे माझे क्रिकेट विश्राम घेईल आणि माझ्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होईल. तुम्ही एका विशिष्ट वयापर्यंत खेळू शकता. कदाचीत माझ्यासाठी अजून एकवर्षे किंवा दोन किंवा एक्सवायझेड.'
तसेच आयपीएल 2024 मध्ये झालेल्या दुखापतीबद्दल शिखर म्हणाला, 'दुर्दैवाने मी यंदाच्या आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झालो आणि पंबाजसाठी 4-5 पेक्षा अधिक सामने खेळू शकलो नाही. बरे होण्यासाठी वेळ लागला, मी अजूनही त्यातून सावरत आहे. मी अजूनही 100 टक्के बरा झालेलो नाही.'
शिखरला 2022 मध्ये पंजाबने 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर त्याला या संघाचे नेतृत्वही देण्यात आले. त्याने 2022 मध्ये 460 धावा ठोकल्या, तर 373 धावा केल्या होत्या. तसेच आयपीएल 2024 मध्ये त्याने 5 सामन्यांत 152 धावा केल्या.
शिखर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने 222 सामन्यांत 2 शतके आणि 51 अर्धशतकांसह 6769 धावा केल्या आहेत.
तसेच शिखर गेल्या काही वर्षापासून भारतीय संघातूनही बाहेर आहे. त्याने भारताकडून अखेरचा सामना डिसेंबर 2022 मध्ये खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 269 सामन्यांत 39.66 च्या सरासरीने 10867 धावा केल्या आहेत. ज्यात 24 शतके आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.