Shreyas Iyer: IPL सुरु असतानाच श्रेयस अय्यरवर झाली शस्त्रक्रिया; WTC फायनलमधून आऊट

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती
shreyas iyer injury
shreyas iyer injury
Updated on

Shreyas Iyer Injury: आयपीएलचा १६ सीझन सुरु आहे. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो WTC फायनलमध्ये खेळणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. (Shreyas Iyer undergoes back surgery ODI World Cup 2023 )

श्रेयस अय्यर बराच काळ पाठीच्या दुखापतीशी झुंजत होता. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरवर मंगळवारी लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएल 2023 चा भाग होऊ शकला नाही.

shreyas iyer injury
CSK IPL News: स्टोक्सच्या पुनरागमनाचा चेन्नईला दिलासा

आयपीएल 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली होती. अहमदाबाद कसोटीत जवळपास पूर्ण दोन दिवस मैदानावर घालवल्यानंतर, अय्यरने पाठीच्या खालच्या भागात सूज आल्याची तक्रार केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत तो फलंदाजीसाठी येऊ शकला नाही.

त्यामुळे आता अय्यरला जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर राहावे लागणार आहे. तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर असेल.

shreyas iyer injury
Apple चे सीईओ टीम कुक DC vs KKR सामना पाहून भारावले; म्हणाले...

श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 10 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 49 टी-20 सामने खेळले आहेत. श्रेयस अय्यरने कसोटीत 666 धावा, एकदिवसीय सामन्यात 1631 धावा आणि T20 मध्ये 1043 धावा केल्या आहेत. तो सध्या टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.