शुभमन गिलची धडाकेबाज कामगिरी; क्रिकेटच्या देवाशी केली बरोबरी

शुभमन गिलने या सामन्यात 63 धावाच्या खेळीसह एक अनोखा विक्रम केला आहे.
Shubman Gill and Sachin Tendulkar record
Shubman Gill and Sachin Tendulkar record
Updated on

आयपीएलच्या 15 व्या हंगामातला 57 सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या हंगामात खूप चढ-उतार आणि अतिशय आश्चर्यकारक घटना पाहिल्या आहेत. यंदाच्या हंगामात या लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ आहे. यांच वेळी नव्याने सामील झालेले संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 62 धावांनी पराभव केला. IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ बनला आहे. या सामन्यात शुभमन गिल सामनावीर ठरला, त्याने 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.(Shubman Gill Record Sachin Tendulkar)

Shubman Gill and Sachin Tendulkar record
दिल्लीसाठी आजच ‘बाद फेरी’; प्लेऑफच्या आव्हानासाठी राजस्थानशी टक्कर

शुभमन गिलने या सामन्यात 63 धावाच्या खेळीसह एक अनोखा विक्रम केला आहे. ज्यामुळे त्याने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुभमन गिलने कालच्या सामन्यात एकही षटकार मारला नाही आणि पहिल्या ते शेवटच्या षटकापर्यंत नाबाद खेळी खेळली आहे.

Shubman Gill and Sachin Tendulkar record
IPL 2022: 23 वर्षीय राशिद खानचा T-20 मध्ये 'हा' महाविक्रम

शुभमन गिलने अशा प्रकारे पहिल्या ते शेवटच्या षटकापर्यंत एकही षटकार न मारता नाबाद खेळण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा पराक्रम फक्त सचिन तेंडुलकरने आयपीएलमध्ये केला आहे. सचिनने हे काम 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना केले होते. त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने 49 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात मुंबईने 19 धावांनी विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.