Shubman Gill: आईचं प्रेम! शुभमन गिलने वाकून नमस्कार करताच अभिषेकच्या आईनेही प्रेमानं थोपटली पाठ, Video व्हायरल

SRH vs GT: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघातील आयपीएल सामना पावसामुळे रद्द झाला असताना यादरम्यान शुभमन गिल अभिषेक शर्माच्या आईला भेटून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसला होता. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Shubman Gill with Abhishek Sharma Family
Shubman Gill with Abhishek Sharma FamilySakal
Updated on

Shubman Gill Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गुरुवारी (16 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना होणार होता. मात्र हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या पावसामुळे हा सामना एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला. मात्र या सामन्यादरम्यानच्या घटनेने अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या कुटुंबाला भेटलेला दिसत आहे. यावेळी गिलने अभिषेकच्या आईचे आशीर्वादही घेतल्या सारख दिसत आहे.

Shubman Gill with Abhishek Sharma Family
Virat Kohli: विराटने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीला फलंदाजी करावी की तिसऱ्या क्रमांकावर? माजी क्रिकेटपटूंच काय मत

अभिषेकच्या आईनेही त्याच्या पाठीवर प्रेमाने थाप मारल्याचे दिसले. तसेच ते सर्व एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले. दरम्यान, गिलने अभिषेकच्या आईप्रती आणि कुटुंबाप्रती दाखवलेल्या आदरामुळे त्याचे क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएलमध्ये जरी गिल आणि अभिषेक वेगवेगळ्या संघाकडून खेळत असले, तरी ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाकडून एकत्र खेळतात. तसेच त्याआधीपासूनही ते विविध वयोगटातही एकत्र खेळले आहेत. २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचाही ते भाग होते. त्यामुळे त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.

Shubman Gill with Abhishek Sharma Family
IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अभिषेक आणि गिल या दोघांचीही आयपीएल 2024 मधील कामगिरी चांगली झाली आहे. गिलने 12 आयपीएल सामन्यांमध्ये 426 धावा केल्या, तर अभिषेकने 12 सामन्यांमध्ये 401 धावा केल्या.

दरम्यान गुरुवारी होणारा सामना रद्द झाल्याने हैदराबाद आणि गुजरात या दोन्ही संघांनी एक-एक पाँइंट विभागून देण्यात आले. त्याचमुळे हैदराबाद 15 पाँइंट्सवर पोहचल्याने त्यांनी प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. मात्र, गुजरातचे आव्हान यापूर्वीच संपले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा शेवटचा सामना होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.