CSK vs PBKS Sikandar Raza : जो जीता वही सिकंदर! रझाच्या त्या 3 धावा धोनीच्या दोन्ही षटकारांवर पडल्या भारी

CSK vs PBKS Sikandar Raza IPL 2023
CSK vs PBKS Sikandar Raza IPL 2023esakal
Updated on

CSK vs PBKS Sikandar Raza IPL 2023 : पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन किंग्जमधील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेर सिकंदरने शेवटच्या चेंडूवर 3 धावा पळून काढल्या अन् पंजाबला आपला पाचवा विजय मिळवून दिला. पंजाबच्या या विजयात प्रभसिमरन सिंग (42) आणि लिम लिव्हिंगस्टोन (40) यांनी मोलाचा वाटा उचलला.

चेन्नईकडून तुषार देशपांडेने 3 तर रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेत 200 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. पथिरानाने देखील शेवटचे षटक चांगले टाकले होते. मात्र सिकंदरने विजय खेचून आणला. चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करताना देखील 20 व्या षटकातील शेवटचे दोन चेंडू स्मरणीय झाले होते. धोनीने दोन्ही चेंडूवर षटकार मारत चेन्नईला 200 धावांपर्यंत पोहचवले. मात्र सिकंदर रझाने शेवटच्या चेंडूवर घेतलेल्या 3 धावा या दोन षटकारांवरही भारी पडल्या.

CSK vs PBKS Sikandar Raza IPL 2023
CSK vs PBKS Devon Conway : कॉन्वेच्या फटकेबाजीवर धोनीचा डबल तडका, शेवटच्या दोन चेंडूत CSK ने गाठला मॅजिक आकडा

चेन्नई सुपर किंग्जचे 201 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या पंजाबने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगने 4 षटकात पंजाबला अर्धशतक पार करून दिले. मात्र तुषार देशपांडेने शिखर धवनची 15 चेंडूत 28 धावांची केलेली खेळी संपवली.

त्यानंतर प्रभसिमरनने फटकेबाजी करत पंजाबला 8 षटकात 80 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 24 चेंडूत 42 धावांची खेळी करणाऱ्या प्रभसिमरनची रविंद्र जडेजाना शिकार करत पंजाबला मोठा धक्का दिला. यानंतर जडेजाने अथर्व तायडेला 13 धावांवर बाद केले. यामुळे पंजाबची अवस्था 3 बाद 94 धावा अशी झाली.

यानंतर लिम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. ही अर्धशतकी भागीदारी तुषार देशपांडेने 16 व्या षटकात फोडली. त्याने 24 चेंडूत 40 धावा करणाऱ्या लिम लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर करन संघाला 170 धावांपर्यंत पोहचवून 29 धावांवर बाद झाला.

CSK vs PBKS Sikandar Raza IPL 2023
MI vs RR Jofra Archer : मुंबईने इंग्लंडच्या दुसऱ्या गोलंदाजाला केले पाचारण, जोफ्रा आर्चरचा पत्ता कट?

दरम्यान, चेंडू आणि धावा यांच्यातील अंतर वाढत असताना जितेश शर्माने 10 चेंडूत 21 धावा चोपत 19 व्या षटकात संघाला 186 धावांपर्यंत पोहचवले. त्याला तुषार देशपांडेने 21 धावांवर बाद केले. यानंतर सामना 6 चेंडूत 9 धावा असा आला. मात्र मलिंगा फेम पथिरानाने 5 षटकात 6 धावा देत सामना 1 चेंडू 3 धावा असा आणला.

पंजाबला सामना जिंकण्यासाठी 3 तर सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी 2 धावांची गरज होती. पंजाबचा सिकंदर रझा स्ट्राईकवर होता. सिकंदरने पथिरानाच्या शेवटच्या चेंडूवर 3 धावा पळून काढत पंजाबला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने सर्वाधिक 52 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावत चेन्नईला 200 धावांपर्यंत पोहचवले. ऋतुराज गायकवाडने 37 तर शिवम दुबेने 28 धावांचे योगदान दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.