Smriti Mandhana RCB : आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने WPL 2024 चे विजेतेपद जिंकत 16 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. WPL च्या दुसऱ्याच हंगामात आरसीबीने विजेतेपदाला गवसणी घातली. यानंतर स्मृती मानधना आणि विराट कोहलीची तुलना होऊ लागली. विराट कोहलीला जे जमलं नाही ते स्मृती मानधनाने करून दाखवलं अशीच भावना चाहत्यांनी व्यक्त केली.
मात्र आरसीबीची कर्णधार स्मृतीने विराट कोहलीसोबत होत असलेल्या अशा प्रकारच्या तुलनेवर प्रथमच भाष्य केलं. माध्यमांशी बोलताना स्मृती म्हणाली की, 'ट्रॉफी जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे मात्र विराट कोहलीने भारतासाठी जी कामगिरी केली आहे ती वाखाण्याजोगी आहे. त्यामुळे मला ही तुलनाच योग्य वाटत नाही. माझी कारकीर्द कुठं आहे आणि त्याने जे मिळवलं आहे ते पाहा.'
स्मृती पुढे म्हणाली की, 'मला ही तुलना यासाठी आवडली नाही की त्याने जे साध्य केलं आहे ते ग्रेट आहे. तो आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. विजेतेपद हे अनेक गोष्टीची व्याख्या करू शकत नाही. आम्ही सर्व त्याचा आदर करतो. त्याचे स्थान उच्चच आहे. माझे देखील मत काही वेगळे नाही.'
स्मृती मानधना आणि विराट कोहली दोघेही 18 नंबरची जर्सी घालतात. त्यावरून देखील या दोघांची तुलना होते. त्यावर स्मृती म्हणाली की, 'मी हे जर्सी नंबर 18 ची तुलना असं समजत नाही. जर्सी नंबर ही एक वैयक्तिक निवड आहे. माझ्या वाढदिवसाची तारीख ही 18 आहे त्यामुळे माझा जर्सी नंबर 18 आहे. यावरून मी कसे खेळते किंवा तो कसा खेळतो याची व्याख्या होत नाही. तो अनेक अंगाने आमच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. त्यामुळे विजेतेपद काहीही सांगत नाहीये.'
आरसीबीच्या पुरूष आणि महिला संघातील तुलनेबाबतही स्मृतीने आपले मत व्यक्त केलं. ती म्हणाली, 'पुरूष संघाने देखील गेल्या 16 वर्षापासून चांगली खेळत आली आहे. ते चांगले खेळले नाहीत असं नाही. त्यामुळे तुलना अयोग्य आहे. आरसीबी ही एक फ्रेंचायजी आहे. त्यामुळे पुरूष आणि महिला संघाला वेगवेगळं समजलं पाहिजे. आम्हाला तुनला व्हावी असे वाटत नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.