T20 World Cup 2024 Sourav Ganguly on Virat Kohli : विराट कोहलीने पंजाबविरुद्धच्या लढतीत ४७ चेंडूंमध्ये ९२ धावांची फटकेबाजी केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले. गांगुली यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये छान फलंदाजी करीत आहे. मागील लढतीत त्याने ९२ धावांची खेळीही साकारली. त्यामुळे टी-२० विश्वकरंडकात भारतासाठी खेळताना त्याने सलामीलाच फलंदाजी करावी.
कर्णधार रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो. त्याच्यासोबत कोणता खेळाडू सलामीला फलंदाजी करील, याची उत्सुकता आहे. पण विराट कोहलीने रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करावी, असे सौरव गांगुली यांना वाटते. त्यामुळे भारताचा फलंदाजी विभाग आणखी मजबूत होईल, असे यामागील कारण आहे.
समतोल संघाची निवड
सौरव गांगुली यांनी टी-२० विश्वकरंडकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचे कौतुकही केले. ते म्हणाले, भारताचा संघ समतोल आहे. फलंदाजी, तसेच गोलंदाजीमध्ये भारतीय संघ समतोल दिसून येत आहे. जसप्रीत बुमरा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज व कुलदीप यादव यांच्या समावेशाने अनुभवाची भर टीम इंडियात पडली आहे.
टी-२० म्हणजे आक्रमक क्रिकेट
सौरव गांगुली यांनी टी-२० क्रिकेटबद्दलही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, संजू सॅमसन हा काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की, टी-२० क्रिकेटमध्ये विश्रांतीला वेळ नसतो. प्रत्येक चेंडू हा टोलवावाच लागतो. यावरूनच टी-२० हे आक्रमक क्रिकेट आहे याची प्रचीती मिळते. यापुढेही असेच चित्र पाहायला मिळणार आहे.
सध्या टी-२० लढतीत बहुतांशी वेळा २४० ते २५० धावा होताना दिसतात. भारतातील मैदाने लहान आहेत. तसेच खेळपट्ट्याही फलंदाजांना पोषक अशा बनवल्या जातात. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे अधिक फलंदाजांचा संघात प्रवेश होतो. या सर्व कारणांमुळे धावांचा पाऊस पडतो. त्यामुळे गोलंदाजांकडे कौशल्य असण्याची गरज आहे. जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव यांसारख्या गोलंदाजांनी ठसा उमटवला आहे. बुमरा, कुलदीप, अक्षर पटेल हे तीनही प्रकारात सातत्याने खेळून प्रभाव टाकत आहेत.
- सौरव गांगुली, माजी कर्णधार, भारत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.