VIDEO : रुक जाना नहीं; अनसोल्ड श्रीसंतला किशोरदांचा 'सहारा'

Sreesanth
SreesanthSakal
Updated on

IPL Mega Auction 2022, IPL 2022 च्या मेगा लिलावात श्रीसंतची झोळी पुन्हा एकदा रिकामीच राहिली. दोन संघ वाढले, युवा आणि अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांची बरसात झाली. पण श्रीसंतला घेण्याची हिंमत एकाही फ्रँचायझीनं दाखवली नाही. मिनी लिलावात शॉर्ट लिस्टही न झालेला यावेळी फायनल यादीपर्यंत पोहचला. पण पुन्हा त्याच्या पदरी निराशाच आली.

या धक्क्यातून सावरण्यासाठी श्रीसंतने (Sreesanth) आता किशोरदांनी गायलेल्या 'रुक जाना नहीं..' (Kishor Kumar Ruk Jana Nahi Motivational Song) या गाण्याचा आधार घेतला आहे. आयपीलच्या मेगा लिलावानंतर (IPL Mega Auction) श्रीसंत पुन्हा एकदा अग्नी परीक्षेला समोर जाण्यासारख्या परिस्थितीत अडकला आहे. याचा सामना करण्यासाठी त्याने 'इम्तिहान' चित्रपटातील प्रेरणादायी गाणं स्वत: गात प्रयत्न सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

Sreesanth
BLOG: 'त्या' घटनेनंतर सुरेश रैनाचा CSK मधून पत्ता झाला कट?

केरळचा जलगतगी गोलंदाज भारतीय टी-20 आणि 50-50 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने 50 मूळ किंमतीसह आयपीएल मेगा लिलावात नाव नोंदवले होते. पण त्याला कुणीही भाव दिला नाही. या संकटाचाही सामना नेटाने करेन. कोणतीही गोष्ट सहज मिळणार नाही. अजूनही काट्यावरुन चालण्यास तयार आहे म्हणत व्हॅलेंटाईन दिवशी त्याने आपलं क्रिकेटवरील प्रेम दाखवून दिले आहे. श्रीसंतने खास कॅप्शनसह आपला व्हिडिओ शेअर केला आहे. सर्वांचा आभारी आहे आण राहिन, सर्वांबद्दल सन्मानाची भावना कायम आहे, ओम नम: शिवाय! अस म्हणत त्याने बीसीसीआयवर कोणताही राग नाही, असा संदेशही दिला आहे.

Sreesanth
IPL Auction : 'हार के जितनेवाला बाजीगर'; श्रीसंतनं शेअर केलेला व्हिडिओ बघाच

आयपीएलच्या इतिहासात यंदाच्या मेगा लिलावामध्ये पहिल्यांदाच 111 खेळाडूंना 10 कोटीपेक्षा अधिक रक्कम मिळाली. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी 15.25 कोटी मोजले. ही यंदाच्या आयपीएल लिलावातील सर्वोत मोठी बोली होती. याशिवाय इशान किशन हा युवराज सिंगनंतर भारतातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.