IPL 2024: 'माझ्या वडिलांमुळेच...' तुफान फलंदाजीने घाम फोडणाऱ्या अभिषेकने सांगितलं त्याच्या शानदार गोलंदाजीमागील रहस्य

Abhishek Sharma News: आयपीएल 2024 मध्ये तुफानी फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या अभिषेक शर्माने क्वालिफायर-2 सामन्यात मात्र त्याच्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली. त्याच्या गोलंदाजीसाठी त्याने त्याच्या वडिलांचाही विशेष उल्लेख केला.
Abhishek Sharma | Pat Cummins
Abhishek Sharma | Pat CumminsSakal
Updated on

Abhishek Sharma News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत फलंदाजीत सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या खेळाडूंमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माचेही नाव येते. त्याने यंदाच्या हंगामात 15 सामन्यांत 3 अर्धशतकांसह 482 धावा काढल्या आहेत. परंतु, क्वालिफायर-2 सामन्यात मात्र त्याच्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली.

क्वालिफायर-2 सामना शुक्रवारी (24 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईला पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थानसमोर विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य दिले होते.

यावेळी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या फिरकीपटूंचा चांगला वापर केला. त्याने या सामन्यात अष्टपैलू खेळाडू असलेल्या अभिषेकलाही 4 षटके गोलंदाजीची संधी दिली. अभिषेकने यंदाच्या हंगामात फारसा गोलंदाजी करताना दिसलेला नाही.

मात्र क्वालिफायर-2 सामन्यात त्याच्या वाटची सर्व 4 षटके गोलंदाजी करायला मिळाली. त्यानेही त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवत 4 षटकात अवघ्या 24 धावा खर्च करत संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेत संघाला 36 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Abhishek Sharma | Pat Cummins
IPL 2024: काय सांगता! आयपीएल फायनलमध्ये खेळणार नाहीत टी20 वर्ल्ड कपमधील एकही भारतीय खेळाडू? जाणून घ्या कारण

दरम्यान, सामन्यानंतर त्याच्या गोलंदाजीबद्दल सांगताना तो म्हणाला, याचे श्रेय त्याच्या वडिलांना जाते, त्यांच्याबरोबर सराव करत त्याने त्याच्या गोलंदाजीवर काम केले.

सामन्यानंतर अभिषेक त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, 'खरं सांगायचं तर मला वाटलं नव्हतं, मला या सामन्यात सर्व 4 षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. पण मी तयार होतो. मी माझ्या गोलंदाजीवर काम करत आहे.'

'मी गेल्या दोन वर्षापासून चांगली फलंदाजी करतोय, पण मला माझ्या गोलंदाजीवरही काम करायचे होते आणि मी ते माझ्या वडिलांबरोबर केले. त्यामुळे माझ्या वडिलांचा विशेष उल्लेख मला करावाच लागेल.'

अभिषेकचे वडील क्रिकेट खेळत असताना डावखुरे फिरकीपटू होते. त्यामुळे त्याचा फायदा अभिषेकला झाला.

तसेच अभिषेकने पुढे सांगितले, 'जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो, तेव्हा खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदतीगार होती, पण जेव्हा आम्ही गोलंदाजीला उतरलो, तेव्हा खेळपट्टीवर चेंडू फिरायला लागला होता.'

'कमिन्सने फिरकीपटूंचा चांगला वापर केला. मी सराव सत्रांमध्ये गोलंदाजीसाठी जो दबाव टाकलेला, कदाचीत त्याचमुळे कमिन्सने मला आज गोलंदाजी दिली. आम्ही पंजाबसाठी जेव्हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलो होतो, मला वाटतं तिथूनच लय सापडली. मी गोलंदाजीसाठी तयार होतो आणि त्यावर काम केले आहे.'

याशिवाय अभिषेकने असेही सांगितले की आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याचे त्याचे स्वप्न होते, जे पूर्ण झाले.

Abhishek Sharma | Pat Cummins
Sanju Samson: 'जसप्रीत बुमराहनंतर तोच...', राजस्थानच्या क्वालिफायरमधील पराभवानंतर सॅमसनने कोणाचं केलं इतकं कौतुक?

क्वालिफायर-2 बद्दल सांगायचे झाले, तर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 175 धावा केल्या होत्या, त्यानंतर 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 7 बाद 139 धावाच करा आल्या.

या विजयामुळे सनरायझर्स हैदराबादने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता आयपीएल 2024 चा अंतिम सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी (26 मे) होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.