MS Dhoni: 'तो लिजंडच...' CSK ला पराभूत केल्यानंतर हैदराबादचा कर्णधार कमिन्ससह खेळाडूंनीही गायलं माहीचं गुणगान

IPL 2024, SRH vs CSK: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने एमएस धोनीच्या लोकप्रियतेबद्दल भाष्य केले आहे.
Sakal
MS Dhoni | SRH vs CSK | IPL 2024Sakal
Updated on

MS Dhoni News: सनरायझर्स हैदराबाद संघाने शुक्रवारी (5 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाला 6 विकेट्सने पराभूत केले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंनी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीचे भरभरून कौतुक केले.

धोनी हा केवळ भारतातच नाही, जगभरातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार असलेल्या धोनीला तो जिथेही जातो, तिथे चाहत्यांकडून प्रेम मिळत असते.

सध्या चालू असलेल्या आयपीएल स्पर्धेतही हे दृश्य दिसले आहे. त्याची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्याचबरोबर तो जेव्हाही मैदानात येतो, तेव्हा त्याच्या नावाने चाहते घोषणा करतानाही दिसतात. हेच दृश्य शुक्रवारी हैदराबादमध्येही दिसले.

Sakal
SRH vs CSK: जडेजाविरुद्ध अपील मागे घेत कमिन्सनं जिंकली मनं, पण माजी भारतीय क्रिकेटरचा संशय की त्यानं...

शुक्रवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सकडून धोनी डॅरिल मिचेल बाद झाल्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, त्यावेळी डावातील केवळ 3 चेंडू बाकी होते. तो फलंदाजीला आता तेव्हा स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात 'धोनी...धोनी...' हा आवाज गुंजला.

त्याने खेळलेल्या पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. पण दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव काढली. दरम्यान, तो मैदानात असताना प्रेक्षक देत असलेल्या घोषणांमुळे निर्माण झालेल्या आवाजाबद्दल हैदराबादच्या कर्णधार पॅट कमिन्सनेही सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली.

तो कौतुकाने म्हणाला, 'प्रेक्षक आज खरोखरच वेडे झाले होते. एमएस मैदानावर आल्यानंतर तर चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला. आतापर्यंत मी स्टेडियममध्ये एवढा आवाज कधीही ऐकला नव्हता.'

याशिवाय आयपीएलनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात हैदराबादच्या संघातील खेळाडूंनी धोनीचे कौतुक केले आहे.

Sakal
IPL 2024 : 300+च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यानंतरही अभिषेकच्या खेळीवर संतापला युवराज... ट्विट करून फटकारले

हैदराबादचा यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेनने म्हटले की 'तो दिग्गज म्हणूनच कायम राहिल, विशेषत: या देशात तरी.'

याशिवाय हैदराबाजचा स्टार फलंदाज एडेन मार्करम म्हणाला, 'तो अजूनही भारीच आहे. तो अजूनही दिग्गज आहे.'

याशिवाय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट म्हणाला, 'प्रत्येकजण धोनीचे चाहते आहे, हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्याभोवती एक वलय आहे.'

दरम्यान, धोनीने आयपीएल 2024 पूर्वी चेन्नईच्या नेतृत्वपदाचा राजीनामा दिला असून ही जबाबदारी त्याने ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे.

चेन्नईचा दुसरा पराभव

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 165 धावा केल्या होत्या. त्यानंतर 166 धावांचे आव्हान हैदराबादने 18.1 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()