Pat Cummins on SRH vs CSK Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 18 वा सामना शुक्रवारी (5 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असून या सामन्यात आयपीएलमधील दोन नवे कर्णधार आमने-सामने येणार आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाने लिलावात 20 कोटींहून अधिक रुपयांना खरेदी केलेल्या पॅट कमिन्सकडे आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.
तसेच या आयपीएल हंगामापूर्वी एमएस धोनीनेही चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे.
असे असले तरी अद्याप धोनी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून चेन्नईकडून खेळत आहे. त्यामुळे ऋतुराजला त्याच्या सल्ल्यांचीही मदत मिळत आहे. आत चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे. धोनीला चतुराईच्या बाबतीत मात देण्याचा विचार करत नसल्याचे त्याने सांगितले आहे.
तो स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, 'कर्णधार म्हणून माझे मुख्य काम हे माझ्या संघातील खेळाडूंकडून उत्तम कामगिरी करून घेणे. त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रतिस्पर्धी संघाबद्दल थोड्याफार गोष्टी जाणून घेता की ते कसे खेळत आहेत वैगरे.'
'पण मला वाटत नाही की मी धोनीसारख्या खेळाडूला चतुराईच्या बाबत मात देण्याचा प्रयत्न करेल. आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याता प्रयत्न करू. आशा आहे की हे काम करेल.'
त्याचबरोबर कमिन्सने असेही म्हटले की पहिल्या तीन सामन्यांपैकी २ सामन्यात पराभव स्विकारल्याने संघ लगेचच मागे पडत नाही. त्यातून पुनरागमनही करू शकतो.
कमिन्स म्हणाला, 'तुम्ही कोणत्याही संघासाठी खेळत असाल, तुम्ही करणार असाल किंवा फक्त खेळाडू असाल, तरी दबाव हा असतोच. आम्हाला माहित आहे की चाहते किती उत्सुक असतात. त्यांना स्टेडियममध्ये आलेलं पाहून छान वाटतं. त्यामुळे वेगळं काही नाही आम्ही सर्वोत्तम देण्याचाच प्रयत्न करू.'
'टी20 क्रिकेट हा अवघड प्रकार आहे. तुम्ही काही चांगले विजय मिळवता, कधी तुम्हाला कठीण पराभवांना सामोरे जावे लागते. मात्र, आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ आणि यंदाचे आयपीएल जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू.'
चेन्नईने आयपीएल 2024 मधील 3 पैकी दोन सामने आत्तापर्यंत जिंकले असून एक सामना पराभूत झाले आहेत. हा सामना चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांसाठी प्रत्येकी चौथा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.