SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals : हैदराबादच्या संघाला मात्र विजयाची नितांत गरज आहे. त्यामुळे हैदराबाद संघाचा राजस्थानविरुद्धच्या लढतीत कस लागणार हे निश्‍चित आहे.
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals News Marathi
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals News Marathisakal
Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals : मागील दोन लढतींमध्ये धावांचा पाठलाग करण्यात अपयश आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघासमोर आज जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान असणार आहे. राजस्थानच्या संघाने आठ विजयांसह आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे.

आणखी एका लढतीतील विजय त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारा ठरणार आहे. हैदराबादच्या संघाला मात्र विजयाची नितांत गरज आहे. त्यामुळे हैदराबाद संघाचा राजस्थानविरुद्धच्या लढतीत कस लागणार हे निश्‍चित आहे.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals News Marathi
CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

हैदराबाद संघाने या मोसमात तीन वेळा अडीशचे धावांचा टप्पा ओलांडला. पण या तीनही वेळा हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी केली होती. मात्र धावांचा पाठलाग करताना त्यांना २०० च्या वरही धावा करता आलेल्या नाहीत. हैदराबादची ही कमकुवत बाजू प्रशिक्षक डॅनियल व्हेट्टोरी यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याला दुजोरा दिला.

व्हेट्टोरी म्हणाले, प्रथम फलंदाजी करताना आम्ही प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे टार्गेट ठेवतो, पण धावांचा पाठलाग करताना आम्हाला यश मिळत नाही. खरेतर आमच्या संघात एकापेक्षा एक असे अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना अडचण येण्याची गरज नाही. याकडे आम्हाला लक्ष देऊन मेहनत करण्याची गरज आहे.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals News Marathi
CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

हेड, अभिषेकवर अवलंबून

हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेड (३३८ धावा) व अभिषेक शर्मा (३०३ धावा) या सलामीवीरांनी मोलाची कामगिरी बजावली आहे, पण या संघाला या दोनच फलंदाजांवर अवलंबून राहता येणार नाही. कारण हे दोघे अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी कामगिरी करता आलेली नाही. याचा फटका हैदराबाद संघाला बसत आहे. एडन मार्करम (१९९ धावा), हेनरिक क्लासेन (२९५ धावा), शाहबाज अहमद (१७६ धावा), नितीशकुमार रेड्डी (१४३ धावा) यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यापुढील लढतींमध्ये त्यांनी चमक दाखवायला हवी.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals News Marathi
Champions Trophy 2025: पाकिस्तानची लगीनघाई! स्पर्धेच्या शेड्युलचा ड्राफ्ट तयार, भारतीय संघाचे सामने ठरवले 'या' शहरात

फलंदाजी सुसाट

राजस्थानचा संघ फलंदाजी, गोलंदाजी या दोन्ही विभागांत दमदार कामगिरी करीत आहे. त्याचे फळ त्यांना विजयाच्या रूपात मिळत आहे. कर्णधार संजू सॅमसन (३८५ धावा), रियान पराग (३३२ धावा), जॉस बटलर (३१९ धावा) यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. यशस्वी जयस्वालही (२४९ धावा) निर्णायक क्षणी फॉर्ममध्ये आला आहे. ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर व रोवमन पॉवेल हेदेखील महत्त्वाच्या क्षणी राजस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. एकूणच काय तर हैदराबादच्या गोलंदाजांसमोर उद्या कडवे आव्हान असणार आहे.

गोलंदाजी विभागही सरस

राजस्थानच्या गोलंदाजांनीही आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लक्षणीय कामगिरी केली आहे. ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा हे वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर अंकुश राखत आहेत. युझवेंद्र चहल याच्या फिरकीच्या जाळ्यात प्रतिस्पर्धी फलंदाज अडकत आहेत. याच कारणामुळे राजस्थानला यंदा आतापर्यंत घवघवीत यश मिळवता आले आहे. हीच कामगिरी कायम राखण्यासाठी राजस्थानचा संघ प्रयत्न करील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.